भद्रावती तालुक्यात सोयाबीन पिकावर लष्करी अळीचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:32 AM2021-08-24T04:32:07+5:302021-08-24T04:32:07+5:30

रात्रीतूनच सोयाबीनचे शेती नामशेष होताना दिसत आहे. दहा वर्षांपूर्वी लष्करी अळी आली होती. त्याची पुनरावृत्ती होते ...

Military larvae attack soybean crop in Bhadravati taluka | भद्रावती तालुक्यात सोयाबीन पिकावर लष्करी अळीचे आक्रमण

भद्रावती तालुक्यात सोयाबीन पिकावर लष्करी अळीचे आक्रमण

Next

रात्रीतूनच सोयाबीनचे शेती नामशेष होताना दिसत आहे. दहा वर्षांपूर्वी लष्करी अळी आली होती. त्याची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे. या समस्येकडे प्रशासन, कृषी विभाग व शासन यांनी सामूहिक लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या हाती आलेले सोयाबीन पीक क्षणात नष्ट होऊन शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती किसान पुत्र समूहाचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांनी व्यक्त केली आहे.

सोयाबीन पिकावरील लष्करी अळीच्या संदर्भात शासनातर्फे योग्य नियोजन होणे आवश्यक आहे. सध्याची सोयाबीनची उभे असलेली पिके व सोयाबीनच्या भावाला असलेला उच्चांकी दर पाहता या वर्षी शेतकरी सुखावतील, असे वाटत होते. परंतु वेळीच त्यावर उपाययोजना न झाल्यास हाती आलेले पीक जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सोयाबीनचे हातात आलेले पीक वाया न जाण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी अळीवर्गीय कीटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन किसान पुत्र शेतकरी समूहाचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांनी केले आहे.

230821\img-20210822-wa0162.jpg

सोयाबीन पिकावर लष्करी अळीचे आक्रमण

Web Title: Military larvae attack soybean crop in Bhadravati taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.