वेकोलिच्या कोलस्टॉकमधील लाखोंचा कोळसा खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 12:36 AM2019-05-12T00:36:30+5:302019-05-12T00:36:59+5:30

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाणीच्या कोल स्टॉकवर मागील १५ दिवसांपासून कोळशाची आग धगधगत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. सोबतच येथे काम करणाऱ्या कामगारांना उन्हाच्या दहाकतेसोबत या आगीची दहकाताही सोसावी लागत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

Millions of coal blocks in Velocoli's coalstock | वेकोलिच्या कोलस्टॉकमधील लाखोंचा कोळसा खाक

वेकोलिच्या कोलस्टॉकमधील लाखोंचा कोळसा खाक

Next
ठळक मुद्देसास्ती कोळसा खाण । १५ दिवसांपासून धगधगतेय आग, वेकोलिचे दुर्लक्ष

नितीन मुसळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाणीच्या कोल स्टॉकवर मागील १५ दिवसांपासून कोळशाची आग धगधगत असून वेकोलिचे मोठे नुकसान होत आहे. सोबतच येथे काम करणाऱ्या कामगारांना उन्हाच्या दहाकतेसोबत या आगीची दहकाताही सोसावी लागत असून त्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. मात्र वेकोलि प्रशासन याकडे गंभीरतेने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत राजुरा तालुक्यात सास्ती, गोवरी, पोवनी, साखरी, गोयेगाव याठिकाणी विविध कोळसा खाणी आहेत. मोठ्या प्रमाणात कोळसा उत्पादन घेतले जाते व खाणीतून काढलेला कोळसा हा कोलस्टॉकवर साठविला जातो. साठविलेल्या या कोळशाला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात आगी लागतात. त्यावर उपाय म्हणून पाणी शिंपडले जाते. त्यामुळे आगीवर नियंत्रण करता येते.सास्ती खुल्या कोळसा खाणीच्या कोलस्टॉवर मागील १५ दिवसांपासून अशीच आग धगधगत असून त्यावर नियंत्रण करण्यात वेकोलि प्रशासन अपयशी ठरत आहे.

पाण्याची पातळी खालावली
कोळसा खाणीमुळे परिसरातील तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. कोळसा खाणीमुळे पाण्याची पातळीही मोठ्या प्रमाणात घटली असून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वेकोलिच्या कोळसा खाणीतून निघणाऱ्या धुरामुळे, अशा आगीमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून परिसरातील सास्ती, धोपटाळा, गोवरी, पोवनी, साखरी गोयेगाव चार्ली, निर्ली, बाबापूर, मानाली, कढोली, माथरा, रामपूरसह इतर गावांना त्रास सहन करावा लागत असल्याची खंत या गावातील नागरिकांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली आहे.

सास्ती-गोवरी परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी नव्हत्या. त्या काळात उन्हाळ्यात नाल्यात पाणी राहत होते. आज जनावरांनाही पिण्यासाठी पाणी नाही. पूर्वीपेक्षा तापमानातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वेकोलिच्या धुळीमुळे व कोळशाच्या आगीमुळे तापमान वाढले आहे. सकाळी १० वाजतापासूनच उन्हाची दाहकता जाणवत आहे. शेतात काम करणे कठीण होत आहे. जनावरांचेही हाल होत आहे.
-भास्कर लोहे, जेष्ठ नागरिक, गोवरी

Web Title: Millions of coal blocks in Velocoli's coalstock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग