कराराअभावी मनपाला पाणीकराचा कोट्यवधींचा भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 06:00 AM2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:29+5:30

महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती करतानाच इरई धरण बांधण्यात आले. तेव्हापासून चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी मिळत आहे. धरणातून १२ दलघमी कोटा मंजूर असला तरी वर्षाकाठी किती दलघमी पाण्याची मनपाकडून उचल करण्यात आला, यासाठी कोणतीही यंत्रणा बसविण्यात आली नाही. या धरणातून पाण्याची उचल करण्यासाठी महापालिकेने सिंचन विभागासोबत अद्याप कुठलाही करार केला नाही.

Millions of crores of water levied in the absence of contract | कराराअभावी मनपाला पाणीकराचा कोट्यवधींचा भुर्दंड

कराराअभावी मनपाला पाणीकराचा कोट्यवधींचा भुर्दंड

Next
ठळक मुद्देपाणीकर थकबाकी प्रकरण : सिंचन विभागाकडून वसुलीच्या नोटिसा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महानगर पालिकेकडून सिंचन विभागाशी करार न करताच इरई धरणातून पाण्याची उचल करत आहेत. हा करार केल्यास पाण्याची उचल केलेल्या रिडींगप्रमाणेच पाणीकर लागू करण्याबाबत सिंचन विभागाने अनेकदा नोटिसा पाठविल्या. मात्र, मनपाकडून याकडे कानाडोळा केले जात आहे. परिणामी, कराराअभावी मनपाला कोट्यवधींचा पाणीकर भुर्दंड बसत आहे.
महाऔष्णिक विद्युत केंद्राची निर्मिती करतानाच इरई धरण बांधण्यात आले. तेव्हापासून चंद्रपूर शहराला इरई धरणातून पाणी मिळत आहे. धरणातून १२ दलघमी कोटा मंजूर असला तरी वर्षाकाठी किती दलघमी पाण्याची मनपाकडून उचल करण्यात आला, यासाठी कोणतीही यंत्रणा बसविण्यात आली नाही. या धरणातून पाण्याची उचल करण्यासाठी महापालिकेने सिंचन विभागासोबत अद्याप कुठलाही करार केला नाही. हा करार झाला असता तर धरणातून पाणी उचल केलेल्या प्रमाणानुसारच सिंचन विभागाला पाणीकर वसुल करावा लागतो. मात्र, सिंचन विभागाने अनेकदा नोटीसा पाठवूनही मनपाने या विभागाशी अद्याप करार केला नाही. त्यामुळे १२ महिन्यांत १२ दलघमी पाणी उचल झाल्याचे गृहित धरून सिंचन विभागाकडून कर आकारला जात आहे. सद्यस्थितीत महानगर पालिकेकडे ६ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे सिंचन विभागाकडून महापालिकेला थकबाकी जमा करण्याच्या नोटीसा पाठविल्या जातात. तर दुसरीकडे आम्ही एवढ्या पाण्याची उचल केली नाही, असा पवित्रा मनपाकडून घेतला जात आहे. परंतु, मूळ समस्या जैसे थे असूनही मनपाने करार करण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलले नाही. सिंचन विभागाने पाणीकर वसूल करण्याबाबत नोटीस जारी केल्यानंतर मनपाकडून प्रतिदावा केला जातो. त्यानंतर बैठका होतात मनपा प्रशासन काही रक्कम अदा करते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. करार न करण्याच्या कारणांबाबत मनपा आयुक्त संजय काकडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र होऊ शकला नाही. दरम्यान, महापौर राखी कंचर्लावार यांना विचारले असता याबाबत आयुक्त माहिती देऊ शकतील, असे सांगितले.

करार झाला असता तर...
चंद्रपूर शहराला दरमहिन्याला पिण्याचे पाणी किती दलघमी लागते आणि धरणातून किती पाण्याची उचल होते, यासंदर्भात करारात स्पष्ट नमुद केले जाते. त्यासाठी पाणी उचल करण्याचे मीटर व अन्य तांत्रिक सामग्री करार करणाऱ्यांकडून लावली जाते. मात्र, मनपाने अशा प्रकाराचा सिंचन विभागासोबत असा करारच केला नाही. त्यामुळे थकबाकी वसुलीवरून नोटीसा पाठविण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहेत.

मुख्य लेखा परीक्षकांकडून ताशेरे
पाणी कराबाबत चंद्रपूर मनपाने सिंचन विभागाशी अद्याप करार न केल्याने करवसुलीचा प्रश्न वादग्रस्त झाला. गतवर्षी याच प्रश्नावरून औरंगाबाद येथील मुख्य जललेखा परीक्षकांनी कडक ताशेरे ओढले होते. शिवाय करार न करता मोघम पद्धतीने पाणी उचल करणाºया मनपाचा पुरवठा तात्काळ खंडित करण्याचे निर्देश दिले.
 

Web Title: Millions of crores of water levied in the absence of contract

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.