तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील सोनुर्लीत रात्रभर चालतो लाखोंचा जुगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2021 12:42 PM2021-08-10T12:42:31+5:302021-08-10T12:43:00+5:30

Chandrapur News राजुरा तालुक्यातील तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील सोनुर्ली या भागातील शिवारात फार्महाऊसमध्ये दररोज लाखोंचा जुगार खेळला जात असल्याची माहिती आहे.

Millions gamble at Sonurli on the Telangana-Maharashtra border | तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील सोनुर्लीत रात्रभर चालतो लाखोंचा जुगार

तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील सोनुर्लीत रात्रभर चालतो लाखोंचा जुगार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील सोनुर्ली या भागातील शिवारात फार्महाऊसमध्ये दररोज लाखोंचा जुगार खेळला जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे अनेक परिवार उद्‌ध्वस्त होत आहेत. या ठिकाणी शनिवार आणि रविवारी रात्रभर जुगार सुरू असतो.

राजुरा तालुक्यात तेलंगणातून शेकडो गाड्या येत असून यामधून गांजाची तस्करी या क्लबच्या आड सुरू आहे याबाबतची माहिती पोलिसांना आहे. असे असतानाही रात्रभर क्लब सुरू कसे राहते, याचे आश्चर्य आहे. या प्रकारामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत आहे. राजुरा तालुक्यात तेलंगणातील व्यक्तींना येण्याची कुठलीही परवानगी नसताना गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती क्लबमध्ये येत आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याबाबत तक्रार दिली होती. मात्र पोलिसांकडून कुठलीच कारवाई झाली नाही. तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री यांनी क्लबवर बंदी घातली आहे. त्यामुळे राज्याच्या सीमावर्ती भागात तेलंगणा राज्याच्या भागातून जुगार खेळणारे महाराष्ट्रामध्ये येत आहेत. हा प्रकार बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Millions gamble at Sonurli on the Telangana-Maharashtra border

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.