माकोना येथे जनावरांचा गोठा जळून लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:29 AM2021-07-30T04:29:28+5:302021-07-30T04:29:28+5:30

चिमूर : तालुक्यातील सावरी जवळील माकोना येथील शेतकरी प्रभाकर नारायण पाल यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा मंगळवारी रात्री ११ वाजेच्या ...

Millions lost due to burning of cattle shed at Makona | माकोना येथे जनावरांचा गोठा जळून लाखोंचे नुकसान

माकोना येथे जनावरांचा गोठा जळून लाखोंचे नुकसान

Next

चिमूर : तालुक्यातील सावरी जवळील माकोना येथील शेतकरी प्रभाकर नारायण पाल यांच्या मालकीचा जनावरांचा गोठा मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास आगीत जळून पूर्णतः खाक झाला आहे.

चिमूर- वरोरा राज्य महामार्गावरून पश्चिमेस पाच किमी अंतरावर असलेल्या सावरी येथून दोन किमी अंतरावर माकोना असून, येथील शेतकरी प्रभाकर नारायण पाल यांच्याकडे जवळपास चार एकर शेती आहे. शेतात सध्या कापूस, सोयाबीन व धान पीक आहे. मंगळवारी सायंकाळी शेतीची कामे आटोपून गावाजवळील गोठ्यात बैल, गुरेढोरे बांधून पार घरी गेले होते. रात्री ११ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने प्रभाकर पाल यांच्या गुरांच्या गोठ्याला आग लावली असल्याची माहिती आहे. यात गोठ्यात बांधलेले दोन बैल जळाले. यातील एका बैलाचा जळून जागीच मृत्यू झाला. दुसरा गंभीर जखमी आहे. गोठ्यात असणारे शेती उपयोगी साहित्य, रासायनिक खत, पाईप, टिन पत्रे व इतर साहित्यही जळून खाक झाले. घटनेचा पंचनामा तलाठी उपरे यांनी केला असून, पंचनाम्याचा अहवाल तहसीलदार यांना तत्काळ देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Millions lost due to burning of cattle shed at Makona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.