लाखोंची चोरबीटी बियाणे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 12:52 AM2019-05-08T00:52:22+5:302019-05-08T00:53:31+5:30
तेलंगणा सीमेलगत असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथे ३ लाख ७५ हजारांचे चोरबीटी कापूस बियाणे कृषी विभाग व पोलिसांनी मंगळवारी जप्त केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : तेलंगणा सीमेलगत असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथे ३ लाख ७५ हजारांचे चोरबीटी कापूस बियाणे कृषी विभाग व पोलिसांनी मंगळवारी जप्त केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्रात चोरबीटी बियाण्यावर बंदी आहे. मात्र, तेलंगणातील व्यापाऱ्यांशी संधान साधून गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नकली बियाण्यांची तस्करी सुरू आहे. नंदवर्धन येथील इंद्र्रपाल धुडसे, संजय धुडसे, शंकर सांगडे हे काही दिवसांपासुन चोरबीटी बियाण्यांची विक्री करीत असल्याची माजिती तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार, पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांना मिळाली. आज या संयुक्त पथकाने धाड छापा टाकून संजय धुडसे याच्याकडून ३०० पॉकेट तर शंकर सांगडे याच्या घरी १७३ पॅकेट आढळून आल्या.
या बियाण्यांची किंमत ३ लाख ७८ हजार ४०० रूपये आहे. पंचनाम्यानंतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. सीमावर्ती भागातील गोंडपिपरी तालुक्यात चोरबीटीची तस्करी सुरू आहे. यात मोठमोठे व्यावसायिक गुंतले. त्यामुळे सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मागील वर्षाच्या खरीप हंगामातही तेलंगणा व आंध्र प्रदेशातून बोगस बियाण्यांची गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. कृषी विभागाने उशिरा कारवाई केली. तोपर्यंत शेकडो शेतकºयांनी पेरणी पूर्ण केली. त्यामुळे यंदा प्रशासनाने सतर्क राहणे अत्यावश्यक झाले आहे.