गोंदेडा यात्रेत लाखोंची उलाढाल
By admin | Published: January 28, 2016 12:49 AM2016-01-28T00:49:41+5:302016-01-28T00:49:41+5:30
राज्यात प्रसिद्ध असलेले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी असलेले गोंदेडा (गुंफा) हे गाव राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे.
यात्रा शांततेत : यंदा प्रथमच दीड लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती
पेंढरी (कोके): राज्यात प्रसिद्ध असलेले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी असलेले गोंदेडा (गुंफा) हे गाव राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. या तपोभूमीत भरलेल्या यात्रेत यंदा दीड लाख भाविकांची गर्दी उसळली होती. या यात्रेदरम्यान लाखो रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे.
या यात्रेनिमित्त मनेरी, स्टिल भांडे, हॉटेल, बांगड्या, कुंकू, राष्ट्रसंतांचे साहित्य, फळे, चपला-जोडे आदी दुकाने लावण्यात आली होती. त्यात खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. यात्रेदरम्यान वडसी, खातोडा, केवाडापेठ, गोंदेडा, खांबाडा येथे एक किंवा दोन नाटकाचे आयोजन केले होते. त्यातही लाखो रुपयांची उलाढाल झाली. तसेच चिमूर आगाराच्या बसेस यात्रेकरूंच्या सेवेसाठी सतत उपलब्ध होत्या. त्यात महामंडळाच्या कर्मचाऱ्यासह सर्वांनी सहकार्य केले. यावर्षी यात्रेकरूंमध्ये वाढ झाल्यामुळे श्री गुरुदेव साधना श्रम गुंफा यात्रा महोत्सव समितीच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झालेली आहे.