परमीटविनाच धावतात मिनीबस

By admin | Published: November 27, 2014 11:31 PM2014-11-27T23:31:17+5:302014-11-27T23:31:17+5:30

परिवहन नियमांचे उल्लंघन करून जिल्ह्यात मिनीबस धावत आहेत. शहर परमीटच्या नावावर राज्य शासनाचा कोट्यवधीचा कर या माध्यमातून बुडविला जात आहे. यासोबत बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या

Minibus runs without permit | परमीटविनाच धावतात मिनीबस

परमीटविनाच धावतात मिनीबस

Next

चंद्रपूर : परिवहन नियमांचे उल्लंघन करून जिल्ह्यात मिनीबस धावत आहेत. शहर परमीटच्या नावावर राज्य शासनाचा कोट्यवधीचा कर या माध्यमातून बुडविला जात आहे. यासोबत बसेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाशी खेळ खेळला जात असल्याचा आरोप विधानसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल यांनी पत्रकार परिषदेत केला. १५ दिवसात प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी आरंभली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
परिवहन विभागाच्या नियमानुसार प्रवासी गाडीसाठी सात वर्षांचे परमीट दिले जाते. नियमानुसार सात वर्षांनंतर त्याचे नुतनीकरण केले जाते. मात्र अनेक मिनीबसच्या मालकांकडून त्याचे नुतनीकरण केले जात नाही. वाहनचालकाला जर वाहन चालवायचे असेल तर परिवहन विभागाकडून ते बदली करून शहर परमीट घ्यायचे असते. त्यानंतर वाहनचालक वाहन घेऊन एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करू शकतो. परिवहन विभागाच्या या नियमांचे पालन सर्व मिनीबस चालकांना बंधनकारक आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात परिवहन विभागाचे या नियमांचे उल्लंघन केले जात आहे.
शहर परमीटसाठी वर्षाला ३२ हजार रुपये देय भरावा लागतो. ही रक्कम वाहतुकीद्वारे भरण्यात येते. परंतु परिवहनासाठी प्रति दिवसाच्या दराने आरटीओकडून तात्पुरते परमीट असणे आवश्यक आहे. या वाहतूक परमीटसाठी शासकीय नियमानुसार प्रति सीट १०.८० रुपये दराने कर आकारला जातो. मात्र हा कर बुडविला जात असल्याचे कत्याल यांचे म्हणणे आहे. यात शासनाचे कोट्यवधीचे नुकसान होत असल्याने राज्य शासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन संवेदनशिलता दाखवावी व या कर चोरीवर आळा घालावा. येत्या १५ दिवसात यासंदर्भात चौकशी केली नाही तर आरटीओंना घेराव घालण्यात येईल, असा इशाराही विधानसभा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन कत्याल यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Minibus runs without permit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.