सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 05:00 AM2021-07-15T05:00:00+5:302021-07-15T05:00:32+5:30

सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना परिपत्रकाच्या आधारे अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत आहे. वाढती महागाई व कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कामगारांच्या किमान वेतनात वाढ करणे आवश्यक आहे. त्यासाठी कामगारांना लागू करण्यात आलेल्या समान किमान वेतन परिपत्रकात बदल करून सिमेंट उद्योगतील कामगारांना नवीन वेतन श्रेणी लागू करणे, २१ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. 

The minimum wage will be applicable to workers in the cement industry | सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू होणार

सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान नवीन वेतनश्रेणी लागू होणार

googlenewsNext
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : परिपत्रात बदल करण्यास कामगार मंत्र्यांचा होकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सिमेंट व त्यावर आधारीत उद्योगातील कामगारांना किमान समान वेतन लागू आहे. मात्र, कंपन्यांकडून त्यांना अल्प वेतन दिले. त्यामुळे परिपत्रकात बदल करून कामगारांना २१ हजार रूपये किमान वेतनात वाढ मागणी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली असता परिपत्रकात बदल करण्याचे तत्वतः मान्य केले. त्यामुळे लवकरच किमान नवीन वेतनश्रेणी लागू होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
सिमेंट उद्योगातील कामगारांना किमान वेतन वाढ व किमान वेतन परिपत्रकात दुरूस्ती करून किमान नवीन वेतन श्रेणी लागू करण्यासाठी कामगार मंत्री मुश्रीफ यांच्या मुुंबई येथील दालनात बैठक पार पडली. यावेळी कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल, कामगार आयुक्त कल्याणकर उपस्थित होते.
सिमेंट उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना परिपत्रकाच्या आधारे अल्प वेतन देऊन त्यांचे शोषण होत आहे. वाढती महागाई व कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असून आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे कामगारांच्या किमान वेतनात वाढ करणे आवश्यक आहे. त्यासाठी कामगारांना लागू करण्यात आलेल्या समान किमान वेतन परिपत्रकात बदल करून सिमेंट उद्योगतील कामगारांना नवीन वेतन श्रेणी लागू करणे, २१ हजार रुपये किमान वेतन देण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. 

कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे वेधले लक्ष
सिमेंट व त्यावर आधारित उद्योगांमध्ये कार्यरत हजारो मजुरांचे बरेच प्रश्न कायम आहेत. जिल्ह्यात उद्योगांचा विस्तार व रोजगाराची निर्मिती व्हावी, यासाठी कामगारांचे प्रश्न सुटणे गरजेचे आहे. या दोन्ही घटकांमध्ये योग्य सुसंवाद राहावा, यादृष्टीने राज्य शासनाकडून प्रयत्न आहे, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यातील २० हजार कामगारांना लाभ 
चंद्रपूर जिल्ह्यात अल्ट्राटेक, माणिकगड, एसीसी, अंबूजा व दालमिया हे पाच सिमेंट उद्योग आहेत. यामध्ये किमान १५ ते २० हजार कामगार काम करतात. सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना समान किमान वेतन लागू करण्याचे एक परिपत्रक आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन सिमेंट उद्योगामध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना अल्प वेतन मिळत असल्याची बाब कामगार संघटनेच्या अध्यक्ष शिवानी वडेट्टीवार, विजय ठाकरे, किशोर भोयर, नारोटतं बाराई, सुधाकर तेजाने, गौतम भासरकर, सुनील धावस, दशरथ राऊत आदींनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

Web Title: The minimum wage will be applicable to workers in the cement industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.