एफडीसीचे अध्यक्ष चंदेल यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा

By Admin | Published: July 1, 2017 12:42 AM2017-07-01T00:42:44+5:302017-07-01T00:42:44+5:30

महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या अध्यक्षाला आता राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला आहे.

Minister of State for FDC Chandel | एफडीसीचे अध्यक्ष चंदेल यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा

एफडीसीचे अध्यक्ष चंदेल यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा

googlenewsNext

बल्लारपूर : महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या अध्यक्षाला आता राज्यमंत्र्याचा दर्जा देण्यात आला आहे. भाजपाचे येथील जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल हे वनविकास महामंडळाच्या अध्यक्षपदावर कार्यरत असून त्यांना राज्यमंत्र्याचा दर्जा मिळाला आहे.
यापूर्वी या महामंडळाच्या अध्यक्षाला नावापुरताच राज्यमंत्र्यांचा दर्जा होता. आता, शासनाने या पदाला अधिकृतपणे राज्यमंत्र्याचा दर्जा दिला आहे. या बाबतचा शासन निर्णय १५ जूनला प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र वनविकास महामंडळात एकूण सहा प्रदेश असून त्यामध्ये १४ वनप्रकल्प विभाग, एक औषधी वनस्पती विभाग, एक आगार विभाग (बल्लारपूर) आहेत. कामाचा आवाका बघता वनविकास महामंडळाच्या अध्यक्षाला राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ती पूर्ण झालेली आहे. राज्यमंत्र्याला ज्या सोयी सवलती असतात, त्या सर्व सोयी सवलती आता वनविकास महामंडळाच्या अध्यक्षाला मिळणार आहेत.

Web Title: Minister of State for FDC Chandel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.