ध्येयवेड्या 'गावठी जिनिअस'च्या पाठीवर मंत्री मुनगंटीवारांची थाप

By राजेश भोजेकर | Published: September 26, 2023 10:01 AM2023-09-26T10:01:15+5:302023-09-26T10:01:32+5:30

आवडीच्या विषयाची पुस्तके दिली भेट

Minister Sudhir Mungantiwar praises goal-obsessed Soham Uike, who became popular across the state due to a video | ध्येयवेड्या 'गावठी जिनिअस'च्या पाठीवर मंत्री मुनगंटीवारांची थाप

ध्येयवेड्या 'गावठी जिनिअस'च्या पाठीवर मंत्री मुनगंटीवारांची थाप

googlenewsNext

चंद्रपूर :  ‘नव्या पिढीमध्ये काहीतरी करून दाखविण्याची जिद्द निर्माण करायची असेल, तर त्यांच्या गुणांचे कौतुक केले पाहिजे’, या तत्वावर विश्वास ठेवणारे राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच पुन्हा एकदा त्याची प्रचिती दिली. एका व्हिडियोमुळे संपूर्ण राज्यात लोकप्रिय झालेल्या ध्येयवेड्या सोहम उईके ऊर्फ गावठी जिनिअसच्या गुणांचे कौतुक करताना त्याला खास पुस्तकांची भेटही दिली.

पोंभूर्णा तालुक्यातील डोंगरहळदी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा सोहम उईके याने अलीकडेच ना. मुनगंटीवार यांची भेट घेतली. सोहम आठव्या वर्गाचा विद्यार्थी असून त्याला आयएएस व्हायचे आहे. खरेतर सगळीच मुले बालपणी काही स्वप्न बघत असतात. पण ते स्वप्न गाठण्यासाठी काय करायचे असते, याची माहिती मुलांना नसते. सोहम उईके याला अपवाद आहे. तो आठव्या वर्गात असला तरीही आयएएस होण्यासाठी काय गरजेचे आहे, याचे ज्ञान त्याला आहे. 

काही दिवसांपूर्वी त्याने आयएएस होण्याची जिद्द पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्याकडे बोलून दाखवली होती. त्यांनी त्याच्यासोबत झालेल्या गप्पांचा व्हिडियो सोशल मिडियावर शेअर केला आणि सोहमची जिद्द बघता बघता सर्वदूर व्हायरल झाली. ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यापर्यंतही ही त्याची माहिती आली. दरम्यान, सोहमच ना. मुनगंटीवार यांच्या भेटीला आला. दोघांमध्ये चांगल्या गप्पा रंगल्या. या गप्पांमधून ना. मुनगंटीवार यांनी सोहमचे आवडते विषय जाणून घेतले. त्यात सोहमने इतिहास, राज्यशास्त्र व भुगोलाची आवड असल्याचे सांगीतले आणि खास करून, इतिहास हा विषय अधिक आवडतो असे सांगितले. त्यानंतर लगेच त्याच्या आवडीच्या विषयांची पुस्तके ना. मुनगंटीवार यांनी सोहमला भेट दिली. यावेळी प्रदेश महामंत्री महिला मोर्चा अल्का आत्राम, ज्योती बुरांडे माजी उपसभापती, धनराज सातपुते उपसरपंच,सोहमचे मामा उपस्थित होते.

आनंद गगनात मावेना

चक्क राज्याच्या वने व सांस्कृतिक मंत्री यांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि एवढेच नव्हे तर आपल्या आवडीची पुस्तकेही भेट दिली…हा अनुभव घेताना सोहम उईकेचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. यावेळी सोहमच्या कुटुंबियांनी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Web Title: Minister Sudhir Mungantiwar praises goal-obsessed Soham Uike, who became popular across the state due to a video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.