जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकरणाची सुधीर मुनगंटीवारांनी घेतली गंभीर दखल; मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2023 08:51 PM2023-08-22T20:51:02+5:302023-08-22T21:06:42+5:30

रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, इतर कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची साक्ष नोंदवून घ्यावी, अशाही सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. 

Minister Sudhir Mungantiwar took serious notice of the case in District General Hospital; Directs a thorough investigation into the death case | जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकरणाची सुधीर मुनगंटीवारांनी घेतली गंभीर दखल; मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे निर्देश

जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकरणाची सुधीर मुनगंटीवारांनी घेतली गंभीर दखल; मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे निर्देश

googlenewsNext

चंद्रपूर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील कार्यरत परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. या प्रकरणाची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी  जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी समिती स्थापन करावी व इन कॅमेरा चौकशीची प्रणाली वापरावी, तसेच रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, इतर कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांची साक्ष नोंदवून घ्यावी, अशाही सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. 

सुधीर मुनगंटीवा परिचारिकेच्या मृत्यू प्रकरणात महत्त्वाचे निर्देश दिले. आपल्याच रुग्णालयात कार्यरत सीमा मेश्राम या परिचारिकेचा उपचाराअभावी मृत्यु होतो, ही रुग्णालय व्यवस्थापनासाठी अतिशय गंभीर बाब असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने या प्रकरणी कोणती चौकशी केली, चौकशी समितीचा निष्कर्ष काय काढला, असे सवालही त्यांनी प्रशासनाला विचारले. रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपस्थित राहणे गरजेचे असताना बहुतांश डॉक्टर ऑनकॉल असतात. ऑनकॉल असणारे डॉक्टर मुख्यालयी राहतात की बाहेरगावी. त्यांना रुग्णालयात राहणे आवश्यक वाटत नाही का, डॉक्टर्स आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडतात का, याचीही उत्तरे मुनगंटीवार यांनी रुग्णालय प्रशासनाला मागितले.

रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी हेल्प डेस्क सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिष्ठाता, सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंता आदींना सोबत घेऊन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे निरीक्षण करावे. प्रत्येक बाबीची नोंद घेतली तर व्यवस्थेतील अभाव दूर करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असेही मुनगंटीवार म्हणाले.

कसून तपास करा

रुग्णालयात डॉक्टरांची येण्याची आणि जाण्याची वेळ, त्यांची उपस्थिती आदी रेकॉर्ड सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासावा. तसेच डॉक्टरांच्या दैनंदिन स्वाक्षरी वहीची तपासणी करून हस्ताक्षर तज्ज्ञांकडून स्वाक्षरीबाबत खात्री करून घ्यावी. रुग्णालय प्रशासनाबद्दल तक्रार असल्यास नागरिकांसाठी तेथे तक्रार बॉक्स लावावा व त्याच्या चाव्या जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द कराव्यात. जेणेकरून तक्रारी गहाळ होणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश ना. मुनगंटीवार यांनी दिले. 

तक्रारींबाबत तात्काळ निर्देश

सायंकाळी पाचनंतर रुग्णालयात शवविच्छेदन केले जात नाही, सोनोग्राफीचे २० रुग्ण झाल्यानंतर इतर रुग्णांना परत पाठविण्यात येते, रुग्णांना छोट्या छोट्या बाबींकरीता डॉक्टर नागपूरला रेफर करतात, रुग्णालयात औषधी व इंजेक्शन न देता डॉक्टर बाहेरून लिहून देतात, सीटीस्कॅन रिपोर्ट मिळत नाही, डायलिसीस मशीन खराब आहे, स्टाफ नर्सची ३७५ पदे रिक्त आहेत, आदी बाबी नागरिकांनी ना. मुनगंटीवार यांच्या ध्यानात आणून दिल्या. ज्या डॉक्टरांची ड्यूटी आहे, ते उपस्थित न राहता दुसऱ्याच डॉक्टरांना पाठविण्यात येते, अशा तक्रारी काही नागरिकांनी केल्या. याबाबत अधिष्ठाता यांनी रोज कोणत्या डॉक्टरची ड्यूटी आहे, त्याचे नाव, मोबाईल क्रमांक, वेळ बोर्डवर लिहावे, असे निर्देशही पालकमंत्री यांनी दिले.

थेट वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना फोन

चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात निष्काळजीपणामुळे परिचारिकेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना फोन केला. तसेच चंद्रपूर येथे येऊन जिल्हा सामान्य रुग्णालय भेट, नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी आणि रुग्णालय व्यवस्थापनाचा आढावा घेण्याची सूचना केली. ना. मुश्रीफ यांनी चंद्रपूर येथे येऊन आढावा घेणार असल्याचे सांगितले.

Web Title: Minister Sudhir Mungantiwar took serious notice of the case in District General Hospital; Directs a thorough investigation into the death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.