मिनी मंत्रालयाचा ५३.२३ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 10:58 PM2019-02-11T22:58:11+5:302019-02-11T22:58:25+5:30
जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० या आर्थिक वर्षांचा ५२ कोटी २३ लाख १०० रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत सादर केला. दरम्यान, सभेत किरकोळ दुरुस्त्या सुचवून या अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अर्थसंकल्पात ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी सर्वाधिक १४ कोटी ५० हजार रुपयांची तरतूद केली आहे. यापाठोपाठ पंचायत राज कार्यक्रमांसाठी तब्बल ११ कोटी ७६ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेचा सन २०१९-२० या आर्थिक वर्षांचा ५२ कोटी २३ लाख १०० रुपयांचा अर्थसंकल्प अर्थ व बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार यांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत सादर केला. दरम्यान, सभेत किरकोळ दुरुस्त्या सुचवून या अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आल्याची माहिती जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या अर्थसंकल्पात ग्रामीण पाणी पुरवठा विभागासाठी सर्वाधिक १४ कोटी ५० हजार रुपयांची तरतूद केली आहे. यापाठोपाठ पंचायत राज कार्यक्रमांसाठी तब्बल ११ कोटी ७६ लाख ५५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच सार्वजनिक मालमत्ता परीक्षणासाठी ७ कोटी ७९ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण विभागासाठी २ कोटी ६० लाख, बाजार आणि जत्रा २ लाख ५० हजार, सार्वजनिक आरोग्य १ कोटी, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग(२० टक्के रक्कम) १ कोटी ७० लाख, समाज कल्याण विभागासाठी २ कोटी ९० लाख, ५ टक्के अपंग निधी १ कोटी ७५ लाख १०० रुपये, ७ टक्के वन महसूल अनुदान १ कोटी ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, समाज कल्याण समिती सभापती ब्रिजभुषण पाझारे, कृषी, पशु व दुग्धशाळा समिती सभापती अर्चना जिवतोडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती गोदावरी केंद्रे व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
पालकमंत्र्यांमुळे ५१७ कोटींची अधिकची विकासकामे
चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे अर्थमंत्री असल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झाला आहे. दोन वर्षांत ५१७ कोटी रुपये प्राप्त झाले असून या निधीच्या दीडपट किमतीची कामे जिल्ह्यातील विविध भागात सुरू असल्याची माहितीही यावेळी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी दिली.
समाज कल्याण व दिव्यांग विभागातील मागील वर्षापर्यंत असलेल्या अनुशेषाची १०० टक्के निधीची तरतूद.
पाणी पुरवठा विभागाचा मागील अनुशेषाचा निधी १ कोटी ४२ लाख ७५ हजार रुपये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न.
महिला व बाल कल्याण विभागाला त्यांच्या न्याय हक्कापेक्षा ९५ लाख ९२ हजार २०० रुपयांचा निधी उपलब्ध.
उत्पन्नवाढीसाठी जि.प.च्या रिकाम्या जागेच्या विकासासाठी आराखडा तयार करणार.