सामाजिक न्यायासाठी अल्पसंख्याक समाजाचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:20 AM2017-12-21T00:20:03+5:302017-12-21T00:20:51+5:30
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती आणि मुस्लीम बांधवांसह अन्य अल्पसंख्याक समुदायावर अत्याचार करण्याच्या घटना वाढीस लागल्या.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जमाती आणि मुस्लीम बांधवांसह अन्य अल्पसंख्याक समुदायावर अत्याचार करण्याच्या घटना वाढीस लागल्या. त्यामुळे हा प्रकार बंद करून संविधानानुसार सन्मानाने जगण्याचा हक्क द्यावा, या मागणीसाठी मगंळवारी राष्ट्रीय (नफ) आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
विशेष न्यायालयाची स्थापना करावी, पीडित कुटुंबांना आर्थिक सहाय्य करावे, भटक्या विमुक्तांना अॅॅट्रासिटीच्या कक्षेत आणावे, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी हाजी अन्वर अली, मनोज आत्राम, फादर सुनीलकुमार फ्रान्सिस, रजिंदरसिंग सलुजा, डॉ. राजू ताटेवार, डॉ. अभिलाषा गावतुरे, डॉ. प्रवीण डोंगरे, अॅड. रफीक, शाहिदा शेख, विजय मुसले, डॉ.सिराज खान, राजेश पिंजरकर, छाया सोनुले, करुणा चालखुरे, संघमित्रा सोनटक्के, मनिषा भसारकर, पोर्णिमा जूलमे, नितेश सिडाम, सुभाष खोब्रागडे, प्रा.पुष्पा पाजारे, शाहीन शफी खान, मुन्नी पठान, माया जुमनाके आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.