कोरोना महामारीत थांबलेली मिनझरी बससेवा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:30 AM2021-09-21T04:30:58+5:302021-09-21T04:30:58+5:30
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सतत पाठपुरावा. चिमूर : चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले मिनझरी गाव जंगलामध्ये आहे. मूरपार कोळसा ...
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सतत पाठपुरावा.
चिमूर : चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले मिनझरी गाव जंगलामध्ये आहे. मूरपार कोळसा खाण जवळ असून, येथील बससेवा कोरोना काळात बंद झालेली होती. यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अखेर आमदार बंटी भांगडिया यांनी चिमूर-खडसंगी- मिनझरी बससाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. अखेर बससेवा सुरू झाल्याने गावकऱ्यांतर्फे सरपंच जगदीश ननावरे यांनी गावात बस येेताच चालक वाहकांचा शाल देऊन सत्कार केला. बसच्या स्वागतासाठी भाजपचे कार्यकर्ते तथा बंदर ग्रामपंचायत सदस्य मनी रॉय, उपसरपंच भरत अथरगडे, ग्राम पंचायत सदस्य कविता अथरगडे, वैशाली दोडके, इंदिरा दोडके, दिगाबर राजूरकर, मनोहर अथरगडे, संदीप उपस्थित होते.
200921\img-20210920-wa0009.jpg
कोरोना महामारीत थांबलेली मिन्झरी बस सेवा पुन्हा सुरू झाली.
आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचा सतत पाठपुरावा.