रस्त्याच्या कामात गैरव्यवहार

By admin | Published: January 12, 2015 10:48 PM2015-01-12T22:48:15+5:302015-01-12T22:48:15+5:30

मूल तालुक्यातील सुशी दाबगाव ते चिरोली - जानाळा मार्गावर चालू असलेल्या डांबरीकरणाच्या कामात गैरव्यवहार होत आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Mischief in road work | रस्त्याच्या कामात गैरव्यवहार

रस्त्याच्या कामात गैरव्यवहार

Next

सुशी दाबगाव : मूल तालुक्यातील सुशी दाबगाव ते चिरोली - जानाळा मार्गावर चालू असलेल्या डांबरीकरणाच्या कामात गैरव्यवहार होत आहे. या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जानाळा ते सुशी दाबगाव या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. मूल, पोंभुर्णा ही दोनही तालुक्याची ठिकाणे आहेत. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ सुरू राहते. मूल, आणि पोंभुर्णा तालुक्यात रेतीचे घाट असल्याने रेती वाहतुकीसाठी याच मार्गाचा वापर केला जात आहे. सततची वाहतूक आणि निकृष्ट डांबरीकरणाने जागोजागी खड्डे निर्माण झाले. त्यामुळे वाहनचालकांना व प्रवाशांना कमालिचा त्रास सहन करावा लागत होता. परिणामी मोठमोठ्या खड्डयाने छोटे मोठे अपघातही घडत होते. काहींचा अपघाताने मृत्यूही झाला आहे. उपाययोजना करण्याच्या उद्देशाने जानाळा-चिरोली-सुशी-दाबगाव मार्गावर डांबरीकरणाचे काम मंजूर करण्यात आले. त्यानुसार सदर मार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र हे कामदेखील निकृष्ट दर्जाचे होत आहे. यात संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. (वार्ताहर)

Web Title: Mischief in road work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.