वेकोलिकडून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:22 AM2017-10-25T00:22:47+5:302017-10-25T00:22:58+5:30

बल्लारपूर वेकालि क्षेत्रांतर्गत पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी ७०० च्यावर शेतकºयांच्या जमिनी वेकोलि प्रशासनाने ताब्यात घेतल्या.

Misconceptions of Project Collapse | वेकोलिकडून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल

वेकोलिकडून प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल

Next
ठळक मुद्देनरेश पुगलिया यांचा आरोप : साखरी येथील उपोषणस्थळी भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर वेकालि क्षेत्रांतर्गत पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी ७०० च्यावर शेतकºयांच्या जमिनी वेकोलि प्रशासनाने ताब्यात घेतल्या. २०१२ च्या हस्तांतर कायद्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकºयांना मोबदला व नोकरी देण्याचे करारनाम्यात नमूद आहे. मात्र वेकोलि प्रशासन रेडीरेक्नरचा आधार घेत प्रकल्पग्रस्त शेतकºयांची दिशाभूल करीत आहे. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होऊ देणार नाही. वेळप्रसंगी न्यायालयाचे दार ठोठावले जाईल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी दिला.
बल्लारपूर वेकोलि क्षेत्राच्या पौनी कोळसा खाण क्रमांक २ व ३ मधील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी १० आॅक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरु केले. मात्र वेकोली प्रशासन अद्यापही कुंभकर्णी झोपेत आहे. आंदोलनाला तीव्र करण्याच्या अनुषंगाने राजुरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी न्याय मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी साखरी येथे सभा घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना नरेश पुगलिया बोलत होते.
यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे, मनपा गट नेते डॉ. सुरेश महाकुलकर, जिल्हा परिषद सदस्य शिवचंद काळे, नगरसेवक अशोक नागापूरे माजी नगरसेवक प्रविण पडवेकर, देवेंद्र बेले, उमाकांत धांडे, साखरीचे सरपंच भाऊजी कोडापे, उपसरपंच अमोल घटे, शेषराव बोंडे, कैलास उरकुडे, कवडू पोटे, रामदास वाग्दरकर यांची उपस्थिती होती.
यावेळी नरेश पुगलिया पुढे म्हणाले, केंद्र व राज्यातील भाजपाचे सरकार शेतकºयांच्या जीवावर उठले आहे. वेकालि एका एकर जमिनीतून २५ ते ३० कोटी रुपये किंमतीच्या कोळशाचे उत्खनन करते. करारनाम्यानुसार प्रकल्पग्रस्तांना एकरी सहा ते १० लाख रुपये मोबदला मिळणे क्रमप्राप्त आहे.
मात्र वेकालि प्रशासन शेतकºयांच्या तोडाला पाने पुसण्याचा प्रकार करीत आहे. जमिनीच्या मालकाला देशोघडीला लावत आहे. न्याय मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी शेतकºयांची एकजूट महत्त्वाची आहे.
संघर्ष करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी तयार राहावे, असेही त्यांनी सांगितले. सभेचे संचालन व आभार प्रदर्शन उत्तम बोबडे यांनी केले. यावेळी प्रकल्पग्रस्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Web Title: Misconceptions of Project Collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.