समाजकंटकांनी गणपती घाटावरील वस्तूंना केले विद्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:30 AM2021-09-27T04:30:29+5:302021-09-27T04:30:29+5:30

बल्लारपूर : जनतेच्या सोयी आणि मनोरंजनाकरिता सार्वजनिक ठिकाणांवर किमती व देखण्या वस्तू समाजकंटकांना बघवत नाहीत. त्यामुळे, काहीही कारण नसताना ...

The miscreants made the objects on Ganpati Ghat look ugly | समाजकंटकांनी गणपती घाटावरील वस्तूंना केले विद्रुप

समाजकंटकांनी गणपती घाटावरील वस्तूंना केले विद्रुप

googlenewsNext

बल्लारपूर : जनतेच्या सोयी आणि मनोरंजनाकरिता सार्वजनिक ठिकाणांवर किमती व देखण्या वस्तू समाजकंटकांना बघवत नाहीत. त्यामुळे, काहीही कारण नसताना त्या वस्तूंची नासधूस करणे, चोरी करणे वा वस्तूला विद्रुप करणे असे घृणास्पद प्रकार ते करीत असतात.

बल्लारपुरात वर्धा नदीच्या विस्तीर्ण गणपती घाटाला नगरपरिषदेने सहल स्थळ करण्याकरिता घाटाचे सौंदर्यकरण केले आहे. या घाटावरून भाविक पूजा-अर्चाचे सामान (निर्माल्य) आणतात. ते संकलित करण्याकरिता निर्माल्य कलश ठेवले. स्टीलचे संरक्षण कठडे उभे केले. लहान मुलांना खेळण्याकरिता फिरत्या रिंगण खुर्ची आणि व्यायामाचे इतर साहित्य बसविले. घाटांच्या प्रवेशद्वारावर हत्तींच्या सिमेंटच्या दोन प्रतिमा उभ्या केल्या. परंतु, समाजकंटकांनी त्या विद्रुप करून ठेवल्या आहेत. काही खुर्ची आणि कठ्ठयाचे रॉड काढून चोरून नेले. हत्तीच्या प्रतिमेची तोडफोड करून त्यांना विद्रुप केले आहे. कलशही जाळले. यावरून समाजकंटकांची मानसिकता दिसून येते. अशांना हेरून त्यांना शिक्षा देणे आवश्यक ठरते. त्याकरिता पालिकेने त्या ठिकाणी सुरक्षा कर्मचारी ठेवणे गरजेचे आहे.

260921\img-20210926-wa0011.jpg

समाजकंटकांनी गणपती घाटावरील वस्तूंना केले विद्रुप

Web Title: The miscreants made the objects on Ganpati Ghat look ugly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.