युवकांनी लावलेल्या वृक्षांना समाजकंटकांनी लावली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2017 01:29 AM2017-04-20T01:29:48+5:302017-04-20T01:29:48+5:30

तालुक्यातील खेमजई या गावातील युवकांनी ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून परिसरात हिरवळ रहावी

Miscreants planted trees by the miscreants | युवकांनी लावलेल्या वृक्षांना समाजकंटकांनी लावली आग

युवकांनी लावलेल्या वृक्षांना समाजकंटकांनी लावली आग

googlenewsNext

खेमजई परिसरातील घटना : गाव विकास संस्थेच्या उपक्रमावर फेरले पाणी
वरोरा : तालुक्यातील खेमजई या गावातील युवकांनी ग्राम विकास संस्थेच्या माध्यमातून परिसरात हिरवळ रहावी तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश देत पोळ्याच्या पाडव्याला ५ एकर शासकीय जमिनीवर ५ हजार वृक्षांची लागवड केली होती. त्या जागेला काही समाजकंटकांनी वनवा लावून झाडे नेस्तानाभूत केल्याची घटनाबुधवारला १९ एप्रिलला उघडकीस आली .
खेमजई परिसरातील १४ हजार एकर परिसरात जंगल व्यापले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन गेल्या कित्येक वर्षांपासून करण्यात येत आहे. या भागातील गारगोटी व पांढरा दगड उपलब्ध असल्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. याबाबत ग्राम पंचायतमध्ये उखननासाठी ना हरकत प्रमाणपत्र न देण्यासाठी ठरावही मंजूर करण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायतीच्या ठरावाला न जुमानता तेथे अवैध उत्तखनन करण्यात येत आहे.
जा जंगलात मागील पोळ्याला खेमजई येथील गाव विकास संस्थेच्या नवयुवकांनी ५ एकरमध्ये विविध जातीच्या ५ हजार वृक्षांची लागवड केली होती. बहुतांश युवक पोळ्याच्या पाडव्याला मद्याच्या आहारी जावून गावात टवाळक्या करीत असतात. पण या युवकांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा संदेश देत पोळ्याचा पाडव्याला पाच हजार वृक्ष लावून हा सण साजरा केला होता.
पण या भागात अवैध उत्खनन करणाऱ्या काही समाजकंटकांनी कशाचीही तमा न बाळगता परिसरात अवैध अतिक्रमण करण्याकरिता जागा मोकळी व्हावी म्हणून वनवा लावला आणि यात ५ हजार वृक्ष नेस्तनाभूत झाले. हा प्रकार युवकांच्या लक्षात येताच संस्थेचे पदाधिकारी व युवक घटनास्थळी पोहचले तर त्यांना घटनास्थळी अवैध उत्खनन होत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची सर्व माहिती तहसीलदार राजेश भांडारकर यांना देताच त्यांनी घटनास्थळी तलाठी यांना पाठविले व मौका तपासणी करून अवैधऊतखानाकरिता वापरण्यात येणारे साहित्य ग्राम पंचायत कार्यालयात जमा करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास चौधरी, रमेश चौधरी, लंकेश भेले आदी युवक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Miscreants planted trees by the miscreants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.