आरक्षणाच्या नावावर सामान्यांची दिशाभूल- थेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:19 AM2021-06-29T04:19:31+5:302021-06-29T04:19:31+5:30
चंद्रपूर : आरक्षण हा विषय अनेक दिवसांपासून समजून अडाणीपणाचे ढोंग असलेला राजकारण्यांची राजकीय स्टंटबाजी झाली. आजपर्यंत जे-जे सरकार सत्तेत ...
चंद्रपूर : आरक्षण हा विषय अनेक दिवसांपासून समजून अडाणीपणाचे ढोंग असलेला राजकारण्यांची राजकीय स्टंटबाजी झाली. आजपर्यंत जे-जे सरकार सत्तेत आले. त्यांनी फक्त आरक्षण देण्याच्या नावावार ओबिसी, मराठा, असो या परत इतर समाज घटक यांची फक्त दिशाभूल केली. प्रत्येक राजकीय पक्ष हा सत्तेत असलेल्या पक्षाचा निव्वळ विरोध म्हणून आरक्षण हा मुद्दा उचलून वैयक्तिक फायदा करून घेत आहे. जोपर्यंत राजकारणी लोक स्वार्थी भावना दूर ठेवून कामे करीत नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील. असे मत संभाजी बिग्रेडचे विभागीय अध्यक्ष विनोद थेरे यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघ, चंद्रपूर द्वारा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती तथा सामाजिक न्याय दिनानिमित्त मराठा सेवा संघ भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या विभागीय अध्यक्षा पुष्पा बोंडे, प्रमुख पाहुणे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दीपक खामनकर, तालुकाध्यक्ष दिनेश पारखी, विठ्ठल आवंडे आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पुष्पा बोंडे यांनी आजच्या परिस्थितीवरून आरक्षणाचा मुद्दा समजून घेण्यास कोणीही इच्छुक नाही. जिकडेतिकडे समाजा-समाजात दुही निर्माण करणारी राजकीय मंडळी दिसून येते आहे. परंतु आता शाहू महाराजासारखे महामानव होणे शक्य नसल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी दीपक खामनकर, सुरेश माळवे, दीपक जेऊरकर, प्रमोद बोंडे आदींनी अशोक घुगरुड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केला. प्रास्ताविक मनोहर माडेकर, संचालन प्रा. सुनील खरवडे, आभार अतुल किनेकर यांनी मानले. कार्यक्रमाला मराठा सेवा, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व इतर सर्व कक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.