पालिकेवरील प्रदूषण मोजणी यंत्रातून जनतेची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:33 AM2021-08-18T04:33:32+5:302021-08-18T04:33:32+5:30

गडचांदूर : नगर परिषद नगराध्यक्षांच्या कार्यालयावर ग्रामपंचायत अस्तित्वात असतानापासून चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालयाने प्रदूषणाची आकडेवारी ...

Misleading the public with the pollution measuring device on the municipality | पालिकेवरील प्रदूषण मोजणी यंत्रातून जनतेची दिशाभूल

पालिकेवरील प्रदूषण मोजणी यंत्रातून जनतेची दिशाभूल

googlenewsNext

गडचांदूर : नगर परिषद नगराध्यक्षांच्या कार्यालयावर ग्रामपंचायत अस्तित्वात असतानापासून चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक कार्यालयाने प्रदूषणाची आकडेवारी मोजण्याकरिता बसविलेले प्रदूषण मोजणी यंत्र शोभेचे ठरले आहे. प्रदूषणाची माहितीही चुकीची येत असल्याचे बोलले जात आहे.

शहरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने यंत्र बसविले. त्यात विशिष्ट प्रकारचा पेपर टाकून दररोज मशीन ८ ते १० तास सुरू ठेवली जाते. तो पेपर काढल्यानंतर चंद्रपूर येथील प्रयोग शाळेत पाठविला जातो. त्यावरून प्रदूषणाची आकडेवारी काढण्यात येते. पेपर मशीनमध्ये टाकणे व काढून चंद्रपूरला पोचविण्यासाठी प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून एजन्सी नेमण्यात आली आहे; परंतु एजन्सीचा कोणताच प्रतिनिधी मागील सहा-सात वर्षांपासून येत नाही. मशीन सुरू असताना मशीनमधून विशिष्ट प्रकारचा आवाज येत असतो. ही मशीन उपयोगात आणली जात नसून कागदोपत्रीच आकडेवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केली जात आहे. बोगस आकडेवारीमुळे शहरातील वाढलेल्या प्रदूषणाची शासन दरबारी नोंद होत नाही. कागदोपत्रीच प्रदूषण कमी दाखवून शासनाची व जनतेची दिशाभूल करून फसवणूक होत आहे. हे यंत्र तत्काळ हटवावे अशी मागणी होत आहे.

कोट

प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने संबंधित एजन्सीवर तत्काळ कारवाई करून नागरिकांच्या जिवाशी खेळणे थांबवावे. अन्यथा, उग्र आंदोलन करण्यात येईल.

- विक्रम येरणे, गटनेते, न.प., गडचांदूर

प्रदूषण मोजणी यंत्र हे मागील ६-७ वर्षांपासून तसेच सुरू आहे. कोणतीही देखरेख केली जात नाही. हे यंत्र तत्काळ हटवावे व बोगस आकडेवारी पाठविणे थांबवावे.

- राहुल उमरे, सभापती, आरोग्य, न. प., गडचांदूर

170821\img-20210815-wa0304.jpg

नगर पालिकेवर लावून असलेले यंत्र

Web Title: Misleading the public with the pollution measuring device on the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.