आनंदवनचा मूल येथे मिशन आनंद सहयोग उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:31 AM2021-09-05T04:31:46+5:302021-09-05T04:31:46+5:30
मूल : कोरोनाकाळात उद्ध्वस्त झालेल्या आणि आर्थिक झळ पोहचलेल्या कुटुंबीयांना महारोगी सेवा समिती वरोराच्या वतीने मिशन आनंद सहयोग या ...
मूल : कोरोनाकाळात उद्ध्वस्त झालेल्या आणि आर्थिक झळ पोहचलेल्या कुटुंबीयांना महारोगी सेवा समिती वरोराच्या वतीने मिशन आनंद सहयोग या उपक्रमांतर्गत मूल तालुक्यातील सुमारे १५० कुटुंबीयांना जीवनाश्यक वस्तूंच्या किटचे वाटप मूल येथील नवभारत कन्या विद्यालयात शुक्रवारी करण्यात आले.
कार्यक्रमाला महारोगी सेवा समितीचे पदाधिकारी रवींद्र नलगठीवार, इकराम पटेल, शौकत खान, उमेश घुलवसे, अश्विनी आंदळकर, झाबिया खान, नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापक मंगला सुंकरवार, विजय सिद्धावार, मंगेश पोटवार, पत्रकार भोजराज गोवर्धन, अमित राऊत, राजू सुत्रपवार आदी उपस्थित होते.
मूल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शोध विचार वेध बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष गौरव श्यामकुळे यांनी महारोगी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मूल तालुक्यातील गरीब आणि गरजू नागरिकांना मिशन आनंद सहयोग या उपक्रमाचा लाभ देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने मूल येथे ३० वस्तू असलेल्या जीवनाश्यक वस्तूंच्या किट सुमारे १५० कुटुंबीयांना वाटप करण्यात आले.