कोविडकाळात पालक गमावलेल्या बालकांसाठी ‘मिशन संगोपन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:34 AM2021-08-18T04:34:17+5:302021-08-18T04:34:17+5:30
कोविड १९ च्या प्रादुभार्वामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटांतील बालकांचे पालन-पोषण करायला कोणीही नसल्यास ...
कोविड १९ च्या प्रादुभार्वामुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या ० ते १८ वर्षे वयोगटांतील बालकांचे पालन-पोषण करायला कोणीही नसल्यास अशा बालकांचे संगोपन व अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षणासाठी जिल्ह्यातील तीन बालगृह निश्चित करण्यात आले आहे. एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची आर्थिक स्थिती सक्षम नाही, अशी बालके शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी महिला व बालविकास विभागाद्वारे जे. एम. फायनान्स फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करण्यात आला. त्यांच्या सहकार्याने अशा बालकांच्या शैक्षणिक शुल्काची अडचण निकाली काढण्यात येणार आहे.
बॉक्स
४६ विधवा महिलांनाही अर्थसहाय्य
कोविड-१९ प्रादुभार्वामुळे विधवा झालेल्या पात्र महिलांना संजय गांधी निराधार योजनेतंर्गत ४६ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. ० ते १८ वर्षे वयोगटांतील बालकांना ज्यांचे एक किंवा दोन्ही पालक गमावले आहे, अशा बालकांना त्यांचे योग्यप्रकारे संगोपन व पालन पोषणाकरिता बालसंगोपन योजनेचा लाभ मिळवून देण्यात येत आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील १३१ प्रकरणांना मंजुरी
जिल्ह्यात आतापर्यंत १३१ प्रकरणात मंजुरी देण्यात आली. अशा बालकांना शासन निर्णयानुसार अनाथ प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. १७ जून २०२१ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हास्तरीय कृती दलामार्फत दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना ५ लाखांचे आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी ३ प्रकरणे मंजूर केल्याची जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.