‘मिशन शक्ती’ला अमीर खानचे पाठबळ मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 10:52 PM2018-08-22T22:52:14+5:302018-08-22T22:52:54+5:30
सामाजिक कायार्साठी प्रसिद्ध असणारे सिनेअभिनेते मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान हे देखील चंद्रपूरच्या जमिनीत उभ्या राहत असलेल्या मिशन शक्तीने प्रभावित झाले आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये अमीर खान यांनी या मिशन शक्तीमध्ये सहभागी होण्याचे मान्य केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सामाजिक कायार्साठी प्रसिद्ध असणारे सिनेअभिनेते मिस्टर परफेक्शनिस्ट अमीर खान हे देखील चंद्रपूरच्या जमिनीत उभ्या राहत असलेल्या मिशन शक्तीने प्रभावित झाले आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये अमीर खान यांनी या मिशन शक्तीमध्ये सहभागी होण्याचे मान्य केले आहे. देशभक्तीच्या या अफलातून प्रयोगासाठी आपले सर्व पाठबळ देण्याचे त्यांनी प्रांजळपणे कबुल केले आहे. लवकरच यासंदभार्तील कार्यक्रमासाठी अमीर खान ताडोबानगरी चंद्रपूरमध्ये येणार आहेत.
मंगळवारी सिने अभिनेते आमिर खान आणि ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या झालेल्या भेटी दरम्यान ताडोबाच्या पराक्रमी वाघांपासून तर या भागातील वन्यजीव, वनसंपदा आणि खाणीच्या साम्राज्याची माहिती ना. मुनगंटीवार यांनी त्यांना दिली. यावेळी त्यांनी चंद्रपूरच्या आॅपरेशन शौर्य मध्ये सहभागी झालेल्या आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या पराक्रमाची गाथा त्यांना सांगितली. सध्या आशियाई स्पर्धा जकार्तामध्ये सुरू आहे. हा धागा पकडून त्यांनी आशियाई स्पर्धा, आॅलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे काही विशिष्ट क्रीडाप्रकारांमध्ये पदक वाढविण्याची क्षमता या भागातील विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे सांगितले. चंद्रपूरमध्ये येत्या डिसेंबरपर्यंत सर्व तालुक्यातील क्रीडा संकुले तयार होत आहे. बल्लारपूर येथे तयार होणाऱ्या विशेष क्रीडा संकुलामध्ये अशा प्रकारच्या क्रीडा प्रकाराला चालना देण्याची तयारी केली जात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. अमीर खान यांना हा प्रयत्न भावला असून त्यांनी अशा पद्धतीने एखादया भागात लोकप्रतिनिधी विशेष प्रकल्पासाठी काम करीत असल्याचे ऐकून आनंद झाल्याचे स्पष्ट केले. या भेटीदरम्यान अमीर खान यांनी ताडोबा परिसरातील वन्यजीव, वनसंपदा जिल्ह्यातील विपुल खनिज संपत्ती आणि खान पर्यटनाला असलेला वाव याबाबतही जाणून घेतले. या परिसराचा इतिहास जाणून घेताना त्यांनी चंद्रपूरला भेट देण्याचे मान्य केले असून मिशन शक्तीला पाठबळ देण्याचे जाहीर केले.
चंद्रपूर-गडचिरोलीला देशसेवेचा इतिहास
चंद्रपूर-गडचिरोली भागातील आदिवासी, मागास व अन्य सर्व समाजातील दुर्लक्षित विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा व कला प्रकारात देशपातळीवर धडक दिली आहे. मिशन शौर्यमध्ये तर एव्हरेस्ट सर करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधले. अगदी पहिल्याच प्रयत्नात आदिवासी आश्रम शाळेतील सतरा-अठरा वर्षाचे विद्यार्थी एव्हरेस्टवर चंद्रपूरचा झेंडा फडकवून आलेत. नुकतेच ब्रम्हपुरीचे येरमे बंधू आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिपसाठी अॅथेन्स येथे रवाना झालेत. मोठ्या प्रमाणात सैन्यामध्ये, अर्धसैनिक दलात, पोलिसात काम करणारे नवजवान आहेत. या प्रदेशाचा देशसेवेसाठी काम केल्याचा स्वत:चा इतिहास आहे.
२०२४ च्या आॅलिंम्पिक क्रीडा स्पर्धेचे उद्दिष्ट
२०१८ मध्ये या विषयक प्रशिक्षणाला सुरुवात होणार असून ना. मुनगंटीवार यांनी यासाठी २०२४ च्या आॅलंपिक क्रीडा स्पर्धेचे उद्दिष्ट ठेवले आहे. पुढील सहा वर्षात या ठिकाणी आॅलिंम्पिक दजार्चे खेळाडू निर्माण होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय समाजामधील सामाजिक पुरुषार्थ वाढविणाºया चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध असणाºया अमीर खान यांनी अशा घटनाक्रमांची नोंद आपल्या चित्रपटांमध्ये घेतली आहे. चंद्रपूर मध्ये ना. मुनगंटीवार करीत असलेल्या या प्रयोगाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
सहा क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित
ना. मुनगंटीवार यांनी मिशन शक्तीमध्ये सहा क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये वेटलिफ्टींग, धर्नुविद्या, नेमबाजी, जलतरण, व्हॉलीबाल व जिम्नॉस्टिक्स या खेळाचा सहभाग असेल. ६ खेळांची निवड केली आहे. यासाठी चंद्रपूर व गडचिरोली परिसरातील सर्व समाज घटकातील गुणवान, काटक, चपळ व उच्च शारीरिक क्षमता असणाºया मुलांची कडक चाचणीद्वारे निवड केली जाणार आहे. या सर्व मुलांना आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि संबंधित क्रीडाप्रकारातील जागतिक दर्जाच्या प्रशिक्षणाची सोय केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील उद्योग-व्यापार जगतातील नामवंत व्यक्तींकडून आर्थिक मदत घेतली जाणार आहे.
पाणी फाऊंडेशनचे अर्थमंत्र्यांकडून कौतुक
पाणी फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ४२५० गावे पाणीदार करण्यासाठी अमीर खान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यांनी घेतलेल्या पुढाकाराचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले. पाणी समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या प्रक्रियेत हा पुढाकार मैलाचा दगड ठरणार असल्याचे ना सुधीर मुनगंटीवार म्हणाले. पाणी फाउंडेशन आणि ग्रीन महाराष्ट्र यांच्या माध्यमातून संयुक्तपणे मोहीम राबविण्यास हरित महाराष्ट्र ही संकल्पना साकार होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.