पैशाच्या वादातून मित्राची हत्या

By admin | Published: June 12, 2016 12:36 AM2016-06-12T00:36:33+5:302016-06-12T00:36:33+5:30

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर वनविभागाच्या पटांगणावर काल शुक्रवारला रात्री मित्रानेच मित्रावर चाकूने वार करुन हत्या केली.

Mitra murdered by money laundering | पैशाच्या वादातून मित्राची हत्या

पैशाच्या वादातून मित्राची हत्या

Next

तीन तासांत आरोपीस अटक : आरोपीवर होते मृताचे १४ हजार रुपये
ब्रह्मपुरी : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर वनविभागाच्या पटांगणावर काल शुक्रवारला रात्री मित्रानेच मित्रावर चाकूने वार करुन हत्या केली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
अजय श्यामराव रामटेके (२३) रा. ब्रह्मपुरी असे मृताचे नाव असून तुषार श्रीपाद येरावार रा. ब्रह्मपुरी असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला अवघ्या तीन तासात पोलिसांनी अटक केली आहे. पैशाच्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
ब्रह्मपुरी शहरातील अनेक नागरिक सकाळी पायदळ फिरण्यास वनविभागाच्या पटांगणावर जात असतात. आज शनिवारी सकाळी काही नागरिकांना कुणीतरी पडून असल्याचे दिसून आले. जवळून पाहिले असत्या युवकाची हत्या झाल्याचे उघडकीस आले. हत्या झाल्याची वार्ता शहरभर पसरली. नागरिकांनी मृता ओळखले. पोलिसांनी सकाळीच घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता त्यांना काही साहित्य हस्तगत झाले. त्या साहित्यावरुन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आरोपी तुषार श्रीपाद येरावार रा. ब्रह्मपुरी यास ३०२ कलमा अन्वये अटक केली.
आरोपीने गुन्ह्यांची कबुली देताना मृत अजयचे १४ हजार रुपये आपल्याकडे कर्ज होते व तो नेहमी त्रास देत होता. त्याचा कायमचा काटा काढावा, या उद्देशाने सापळा रचून हत्या करण्यात आल्याचे त्याने सांगितले. मृत अजय व आरोपी एकमेकांचे चांगले मित्र असल्याचे बोलले जात आहे. या तपासात पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर, एपीआय भास्कर पिसे, वानखेडे, खंडारे, पोलीस जमादार ठाकरे, पेंदोर, शेडमाके, दुधे यांनी परिश्रम घेतले. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

असा लागला छडा
अवघ्या तीन तासात ब्रह्मपुरी पोलिसांनी संशयित म्हणून मृताच्या मित्रांना ताब्यात घेतले. त्यामध्ये आरोपी तुषार श्रीपाद येरावार याने गुन्ह्यांची कबुली दिल्याने या प्रकरणाचा छडा लागला. तसेच या गुन्ह्यात आणखी कुणी गुंतले आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

घटनास्थळावर आढळले साहित्य
वनविभागाच्या पटांगणावर रेल्वे लाईनला लागून असलेल्या मृतदेहाजवळ चाकू, रिकामे झालेले वेपर्स पॉकेट, पाणी पाऊच, प्लॅस्टीक ग्लास, दारुची बॉटल, सिगारेटचे तुकडे व पेचकस आणि मृताची मोटरसायकल व मोबाईलचे दोन सिम पोलिसांनी हस्तगत केले.
अशी झाली हत्या
मृत अजयने आरोपीकडे पैशाचा तगादा लावला. त्यामुळे आरोपी चांगलाच संतप्त झाला होता. कायमचाच काटा काढण्याच्या उद्देशाने शुक्रवारला रात्री १०.३० दरम्यान आरोपीने वेपर्स, पाणी पाऊच व दारुची व्यवस्था करुन अजयला बोलविले. यावेळी आरोपीने चाकूही आणला होता. अजय व आरोपी निर्जन स्थळी गेले. तिथे आरोपीने वाद घातला व अजयवर चाकू व पेचकसने सपासप वार केले.

Web Title: Mitra murdered by money laundering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.