मामा तलावात पाणी येण्यासाठी आमदारांची स्वखर्चातून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:29 AM2021-07-27T04:29:20+5:302021-07-27T04:29:20+5:30
चिमूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या बेलारा येथील शेतकरी बांधव शेती व्यवसायावर अवलंबून असल्याने पावसाच्या लहरीपणामुळे तलाव ...
चिमूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या बेलारा येथील शेतकरी बांधव शेती व्यवसायावर अवलंबून असल्याने पावसाच्या लहरीपणामुळे तलाव पूर्णपणे भरला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट येऊन नुकसान होत होते. मामा तलावात जंगलातील पावसाचे पाणी आणण्यासाठी अडचण निर्माण होत होती. ही बाब शेतकऱ्यांनी आमदार बंटी भांगडिया यांना सांगितली. आ. भांगडिया यांनी वन विभागाशी संपर्क करून त्या कामासाठी स्वखर्चातून आर्थिक मदत केली. जेसीबी मशीनद्वारे दोन कि.मी. खोल नाली केल्याने जंगलातील पावसाचे पाणी मामा तलावात येत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
चिमूर तालुक्यातील जंगलाशेजारी बेलारा गाव असून, या गावातील शेती व्यवसाय मुख्य असून, धानाचे मुख्य पीक आहे. धान व शेती पिकासाठी पाऊस अत्यंत आवश्यक आहे. मामा तलावाच्या भरवशावर शेती अवलंबून आहे. सिंचनाची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. मामा तलाव पूर्णपणे भरून राहिल्यास धान पीक भरघोस येऊ शकते; परंतु पावसाच्या लहरीपणामुळे तलावात पाणी येत नाही. खडक दगडी भाग असल्याने जंगलातील पावसाचे पाणी तलावात न येता वाया जात होते. खडक भागामधून नाली काढणे कठीण होते. तेव्हा शेतकऱ्यांनी प्रवीण गणोरकर व विवेक कापसे यांच्या माध्यमातून आ. भांगडिया यांची भेट घेऊन आपबिती सांगितली. जेसीबी मशीनद्वारे दोन कि.मी. नाली काढण्याचा खर्च भांगडिया यांनी दिला.
260721\img-20210716-wa0022.jpg
आमदार बंटी भाऊ भांगडीया यांनी दिला बेलारा येथील शेतकऱ्यांना दिलासा