आमदारांनी घेतला विविध विभागांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:18 AM2021-06-27T04:18:51+5:302021-06-27T04:18:51+5:30

जिवती : तहसील कार्यालय जिवतीच्या वतीने पंचायत समिती येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिवती तालुक्यातील विविध विभागांच्या कार्यालयीन ...

MLAs reviewed various departments | आमदारांनी घेतला विविध विभागांचा आढावा

आमदारांनी घेतला विविध विभागांचा आढावा

Next

जिवती : तहसील कार्यालय जिवतीच्या वतीने पंचायत समिती येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली जिवती तालुक्यातील विविध विभागांच्या कार्यालयीन अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.

यात सर्व विभागाने योग्य समन्वय साधून कामकाज वेळेवर पूर्ण करणे, येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करणे, जनकल्याणकारी कामांना प्राधान्य देऊन ती पूर्ण करणे, अशा अनेक महत्त्वपूर्ण सूचना आमदार धोटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. याप्रसंगी जिवती तालुक्यातील लाभार्थ्यांना आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते एकूण १७ सतरंजीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पं.स. सभापती अंजना पवार, तहसीलदार बनसोडे, गटविकास अधिकारी एस. आस्कर, मुख्याधिकारी कविता गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी एस. मालवी, उपविभागीय अभियंता ओ.एस. दराडे, अन्नपुरवठा विभाग निरीक्षक सविता गंभिरे, पोलीस निरीक्षक साईनाथ अंबिके, उपविभागीय अभियंता दी.प. मिश्रा, सहायक अभियंता ए.जे. शेंडे, सहायक अभियंता कुणाल येनगंदेवार यासह सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

Web Title: MLAs reviewed various departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.