आमदारांनी सुपरवायझरच्या कानशिलात लगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 11:15 PM2018-02-12T23:15:09+5:302018-02-12T23:15:31+5:30
शेतकऱ्यांना मोबदला न देता शेतात टॉवरचे काम सुरू असताना तेथील सुपरवायझरला आ. बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. त्याला थापडही लगावली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
आॅनलाईन लोकमत
राजुरा : शेतकऱ्यांना मोबदला न देता शेतात टॉवरचे काम सुरू असताना तेथील सुपरवायझरला आ. बाळू धानोरकर यांनी चांगलेच धारेवर धरले. त्याला थापडही लगावली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
तेलंगणा राज्यातील कन्नूरपासून वरोऱ्यापर्यंत ६५६ केव्हीची ट्रान्समिशन लाईन टाकण्यात येत आहे. ही लाईन शेतकऱ्यांच्या शेतातून टाकली जात आहे. मात्र शेतकºयांना मोबदला दिला जात नाही आहे. कुठलाही शेतकऱ्यांसोबत करार न करताच कामे केली जात आहे. यामुळे संतप्त झालेले वरोराचे आमदार बाळू धानोरकर हे राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथे पोहचले. तिथे त्यांनी नागरी-कन्नूर ट्रान्समिशन कंपनीचे काम बंद पाडले. कंपनीचे सुपरवायझर शेतकºयांना चांगली वागणूक देत नसल्याचे शेतकºयांनी सांगताच आ. धानोरकर संतापले.
त्यांनी सुपरवायझरला थापड लागवल्याची माहिती आहे. त्यानंतर सुपरवायझर पसार झाला. या प्रकाराची पोलिसात कुठलीही तक्रार देण्यात आलेली नाही. या संदर्भात आ. बाळू धानोरकर यांच्याशी संपर्क साधला असता सदर कंपनी शेतकऱ्यांना मोबदला न देता काम करीत आहे. कंपनीचा सुपरवायझर कामाबाबत माहिती विचारायला आलेल्या शेतकºयांना उद्धट वागणूक देत असल्याने त्याला थापड मारली, असे सांगितले.