नियतीने मायबाप हिरावलेल्या लेकरांचे मनसेने स्वीकारले दायित्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:28 AM2021-08-15T04:28:19+5:302021-08-15T04:28:19+5:30
दाताळा येथील बाळा घागरगुंडे यांचे मागील वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा वैभव (१५), मुलगी पौर्णिमा ...
दाताळा येथील बाळा घागरगुंडे यांचे मागील वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा वैभव (१५), मुलगी पौर्णिमा (२०) यांच्यावर वडिलांच्या जाण्याने आभाळ कोसळले. मोठी मुलगी पदवीच्या पहिल्या वर्षात तर लहान मुलगा दहावीत असल्याने पुढचे शिक्षण कसे करायचे, घरची चूल कशी पेटवायची, हा प्रश्न उभा ठाकला. घराशेजारी मुलांचे मोठे वडील, काका राहतात; परंतु त्याची परिस्थितीसुद्धा बेताचीच आहे. ही माहिती मनसेचे करण नायर, मयूर मदनकर, यश घागरगुंडे यांना मिळताच त्यांनी मनविसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांना माहिती दिली. त्यांनी लगेच त्या कुटुंबाची भेट घेत मोठ्या भावाच्या नात्याने जबाबदारी घेतली. त्यांना महिन्याला लागणारे धान्य व किराणा तसेच आर्थिक साहाय्य करण्याचे दायित्व त्यांनी स्वीकारले. शिक्षणात येणाऱ्या अडचणी व इतर मदतीसाठी त्यांचा मोठा भाऊ सदैव त्यांच्या पाठीशी राहील, अशा शब्दात त्यांनी त्या मुलांना मायेचा आधार दिला. शनिवारी त्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य तसेच किराणा साहित्य व धान्य भेट देण्यात आली. यावेळी मनसेचे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.