कामगारांवरील अन्यायाविरुध्द मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:38 AM2020-12-30T04:38:09+5:302020-12-30T04:38:09+5:30
जीएमआर कंपनीवर धडक : समस्या न सोडल्यास आंदोलन तीव्र करणार चंद्रपूर : भटाळी वेकोलि कोळसा खाण अंतर्गत जीएमआर कंपनीद्वारे ...
जीएमआर कंपनीवर धडक : समस्या न सोडल्यास आंदोलन तीव्र करणार
चंद्रपूर : भटाळी वेकोलि कोळसा खाण अंतर्गत जीएमआर कंपनीद्वारे कामगारांवर केल्या जात असलेल्या अन्याया विरोधात मनसे नेते मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात जीएमआर कंपनीत धडक देण्यात आली. यावेळी कामगारांच्या समस्या दोन दिवसात न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
भटाळी वेकोलि खासगी कंपनीत जीएमआर कंपनीच्या माध्यमातून काम केले जाते. मात्र येथील कामगारांना ३० दिवसाचे काम न देता केवळ २६ दिवसाचे काम दिले जात असल्याचे आंदोलकांचे महणणे असून अत्यल्प वेतन मिळते. कामगारांचा कुठलाही आरोग्य विमा काढला जात नाही. बोनस देण्यात येत नाही, कंपनीमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने एखाद्यावेळी अपघात झाल्यास रुग्णालयात नेताना अडचण जाते. कामगारांना मेसचा लाभ न देता मेसचे पैसे कपात करण्यात येत आहेत. या सर्व समस्या घेऊन मनसेतर्फे जीएमआर कंपनीवर धडक देण्यात आली. यावेळी मनसेचे मनदीप रोडे यांनी व्यवस्थापकांक्षी चर्चा केली. दोन दिवसात कामगारांच्या समस्या सोडवल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी मनसे तुकूम शाखा अध्यक्ष संगीता धात्रक, सचिव सुमित करपे, संदीप अरडे, नितीन बावणे, मुकेश बावणे, आशिष शेंडे, रवी पवार, प्रेमचंद सोनकर, मारोती बोबडे, अनमोल साओ, सुरेंद्र साओ, खामत आदी उपस्थित होते.