स्थानिकांना रोजगारासाठी मनसेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:32 AM2021-08-13T04:32:13+5:302021-08-13T04:32:13+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या संख्येने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. नोकरीसाठी ते भटकत आहे. मात्र बेरोजगारांच्या हाताला रोजगार ...
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या संख्येने बेरोजगारांची संख्या वाढत आहे. नोकरीसाठी ते भटकत आहे. मात्र बेरोजगारांच्या हाताला रोजगार नाही. या मागणीसाठी आंदोलन केल्यास आंदोलनकर्त्यांवरच खोटे गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप करून मुख्यमंत्र्यांपर्यंत जिल्ह्यातील बेरोजगारांची माहिती व्हावी यासाठी मनसेचे मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. रोजगाराची मागणी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचावी यासाठी एक लाख पत्र पाठविण्याच्या मोहिमेचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.
स्थानिक उद्योगात शासकीय नियमानुसार स्थानिकांना रोजगार द्यावा, उद्योगात नोकरी देताना स्थानिक कॅम्पस घ्यावा, पतप्रांतीयांना रोजगार देताना पोलीस व्हेरिफिकेशन करावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसे उपजिल्हा अध्यक्ष, नगरसेवक सचिन भाेयर, भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर, माया मेश्राम, सुमित करपे, बाळा चंदनवाडे ॲड. नवाज शेख यांच्यासह मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.