माता महाकाली मंदिरासमोर मनसेचे घंटानाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:32 AM2021-09-05T04:32:17+5:302021-09-05T04:32:17+5:30

चंद्रपूर : सत्ताधाऱ्यांचे मेळावे राजकीय पक्षांचे मोर्चे, आंदोलने राज्यभर सुरू आहेत; परंतु आध्यात्मिक ठिकाणे ज्यामुळे सामान्य नागरिकांना आत्मविश्वास येतो, ...

MNS bell ringing in front of Mata Mahakali temple | माता महाकाली मंदिरासमोर मनसेचे घंटानाद

माता महाकाली मंदिरासमोर मनसेचे घंटानाद

Next

चंद्रपूर : सत्ताधाऱ्यांचे मेळावे राजकीय पक्षांचे मोर्चे, आंदोलने राज्यभर सुरू आहेत; परंतु आध्यात्मिक ठिकाणे ज्यामुळे सामान्य नागरिकांना आत्मविश्वास येतो, अशी प्रार्थनास्थळे, मंदिरे उघडण्यासंबंधी सरकार निरुत्साही आहे. सामान्य नागरिकांच्या भावना समजून न घेता सरकार आपल्याच सत्तेत आणि राजकारणात मदमस्त झाले आहे, असा आरोप करीत चंद्रपूर जिल्ह्याचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिरासमोर राज्य सरकार विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घटनांद आंदोलन करीत तीव्र निदर्शने केले. यावेळी प्रवेशद्वाराजवळ पूजा करून सरकारला सद्बुद्धी दे, सरकारला जाग येऊ दे, असे साकडे माता महाकालीकडे मनसेने नारळ फोडून घातले.

महाराष्ट्रात संस्कृतीत महत्त्वाचा वाटा असणाऱ्या मंदिरांना बंत्त्वूऊन संस्कृतीविरोधी मदिरालये मात्र सरकारने उघडले, अशा हे दुतोंडी सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही, असा आरोप यावेळी मनसेने केला. हे आंदोलन मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले. आंदोलनात महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव किशोर मडगूलवार, महिला सेना जिल्हा उपाध्यक्ष शोभा वाघमारे, तालुकाध्यक्ष प्रकाश नगरकर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, मनविसे तालुकाध्यक्ष विवेक धोटे, पडोली ग्रा. पं. सदस्य, निशिकांत पिसे, ग्रा.पं. सदस्य नितीन टेकाम, शहर संघटक मनोज तांबेकर, शहर उपाध्यक्ष सुयोग धनवलकर, मनसे शहर सचिव पिंटू धिरडे, करण नायर, शैलेश सादलावर, मनविसे शहर उपाध्यक्ष पीयूष धुपे, अर्चना आमटे, वाणी सादलावर, कृष्णा गुप्ता, बाळू शेवते, राज वर्मा, वर्षा भोमले, चैतन्य सदाफळ, ऋषिकेश बालमवार, गणेश देशमुख, सिद्धार्थ सुरपाम, तन्मय पेटकर, अमोल चौधरी, प्रतीक गोहोकार व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Web Title: MNS bell ringing in front of Mata Mahakali temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.