कोरोना रुग्णांसाठी मनसेचा मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:30 AM2021-04-28T04:30:32+5:302021-04-28T04:30:32+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑक्सिजनयुक्त बेड, व्हेटिलेटरसाठी रुग्ण प्रतीक्षा करावी लागत आहे. ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा मृत्यूही ...

MNS's helping hand for Corona patients | कोरोना रुग्णांसाठी मनसेचा मदतीचा हात

कोरोना रुग्णांसाठी मनसेचा मदतीचा हात

googlenewsNext

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ऑक्सिजनयुक्त बेड, व्हेटिलेटरसाठी रुग्ण प्रतीक्षा करावी लागत आहे. ऑक्सिजनअभावी काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे मनसेनिकांनी रुग्णांना मोफत ऑक्सिजन पुरविण्याचा निर्णय घेतला. पाच ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून दररोज गरजूपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांनी संपर्क करताच त्याचे कागदपत्र व डॉक्टरांची चिठ्ठी घेऊन आवश्यक त्या ठिकाणी सिलिंडर पोहोचविण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून त्याचा हा नित्यक्रम सुरू असून अनेक गरजूंना याचा फायदा मिळाला आहे. यासाठी मनसेचे विवेक धोटे, कुलदीप चंदनखेडे, प्रकाश नागरकर, किशोर मडगुलवार, महेश शास्त्रकर, नितीन पेंदाम, मनोज तांबेकर, करण नायर, मयूर मदनकर, नितीन टेकाम, निशिकांत पिसे, राकेश बोरीकर, अक्षय चौधरी, सुयोग धनवलकर, पीयूष धुपे आदी प्रयत्न करीत आहे.

बॉक्स

चंद्रपुरात मोफत रुग्णवाहिका

कोरोनाच्या स्थितीत अनेक रुग्णवाहिका अव्वाच्या सव्वा दर आकारून रुग्णांची लूट करण्यात येत आहे. चंद्रपुरातील चंद्रपुरात ५ हजारापर्यंत दर आकारण्यात येत आहे. त्यामुळे मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी स्वत: पुढाकार घेत कोरोना रुग्णाला चंद्रपुरातील चंद्रपुरात सोडून देणे, हॉस्पिटलमध्ये नेणे यासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.

Web Title: MNS's helping hand for Corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.