ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यासाठी फिरता दवाखाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:30 AM2021-09-18T04:30:40+5:302021-09-18T04:30:40+5:30

चंद्रपूर : आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने मेडिकेअर हेल्थ सर्व्हिसेसमार्फत ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यांसाठी तीन फिरत्या दवाखान्यांची सेवा उपलब्ध ...

Mobile clinic for Brahmapuri, Savli, Sindevahi taluka | ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यासाठी फिरता दवाखाना

ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यासाठी फिरता दवाखाना

googlenewsNext

चंद्रपूर : आयसीआयसीआय बँक फाउंडेशनच्या वतीने मेडिकेअर हेल्थ सर्व्हिसेसमार्फत ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यांसाठी तीन फिरत्या दवाखान्यांची सेवा उपलब्ध झाली आहे. या फिरत्या दवाखान्याच्या माध्यमातून मोफत तपासणी आणि औषधोपचार करण्यात येणार आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

ब्रह्मपुरी येथे आधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज दवाखान्यांचा (मोबाइल क्लिनिक व्हॅन) लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी आमदार अभिजित वंजारी, नगराध्यक्षा रीता उराडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड आदी उपस्थित होते.

फिरते दवाखाने हे गावागावात जाऊन नागरिकांची तपासणी करणार आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, या माध्यमातून रक्तदाब, मधुमेह, डेंगू, मलेरिया आदी संसर्गजन्य आजारांची चाचणी करून मोफत औषधोपचार केला जाईल. जिल्ह्यातील नागरिकांना याचा नक्कीच फायदा होणार असल्यामुळे नागरिकांनी सुद्धा नेमून दिलेल्या वेळेत उपस्थित राहून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. उपक्रमासाठी समन्वयक म्हणून उपमुख्यमंत्री कार्यालयातील कौस्तुभ बुटाला हे जबाबदारी पार पाडत असून, आयसीआयसीआय बँकेच्या गव्हर्नमेंट ॲण्ड इन्स्टिट्यूट बिझनेसचे सौरभ सिंग, वेस्टर्न झोनचे आशिषकुमार रंजन, विवेक बल्की यांच्या प्रयत्नामुळे ही सेवा उपलब्ध होत आहे.

या व्हॅनमध्ये एक डॉक्टर, परिचारिका व हेल्पर राहणार आहे. या फिरत्या दवाखान्यांमध्ये सहा प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार असून कोरोनाची चाचणीही केली जाणार आहे. या दवाखान्यांमध्ये प्राथमिक आरोग्यासाठी २० प्रकारची औषधी उपलब्ध आहे. ग्रामस्थांच्या तपासणीनंतर तीन दिवसांपर्यंतची औषधी मोफत दिली जाणार आहे.

बॉक्स

मोबाइल ट्रेकिंग सिस्टम व ॲपचीही सुविधा :

फिरत्या दवाखान्यामध्ये मोबाइल ट्रेकिंग सिस्टम विकसित करण्यात आली आहे. या सिस्टममध्ये व्हॅनमधील स्वच्छतेसह दररोज होणाऱ्या तपासण्याचा तपशील, व्हॅन कुठे जाते, किती किलोमीटर फिरते, याचाही तपशील राहणार आहे. शिवाय डॉक्टर-पेशंट ॲप हेदेखील रुग्णांच्या उपयोगी पडणारे ॲप यात आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर व ॲप डाऊनलोड केल्यानंतर रुग्णांची सर्व माहिती भरल्यास सदर माहिती डॉक्टरांच्या मोबाइलवर जाईल. त्यावरून डॉक्टरांकडून औषधींचा तपशील मोबाइलवरच पाठविला जाणार आहे.

Web Title: Mobile clinic for Brahmapuri, Savli, Sindevahi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.