ना हातात बसतात, ना खिशात मावतात, असे मोबाइल चोरट्यांना सोईचे ठरतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:28 AM2021-08-15T04:28:22+5:302021-08-15T04:28:22+5:30

स्मार्ट मोबाइल आता सर्वांचीच गरज बनली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचे मोबाइल लाँच करीत आहे. अनेक जण ...

Mobile thieves are comfortable as they do not fit in their hands or in their pockets | ना हातात बसतात, ना खिशात मावतात, असे मोबाइल चोरट्यांना सोईचे ठरतात

ना हातात बसतात, ना खिशात मावतात, असे मोबाइल चोरट्यांना सोईचे ठरतात

Next

स्मार्ट मोबाइल आता सर्वांचीच गरज बनली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या बाजारपेठेत वेगवेगळ्या प्रकारचे मोबाइल लाँच करीत आहे. अनेक जण चांगला कॅमेरा असणार व जास्त स्टोरेज असणाऱ्या मोबाइलला पसंती देत आहेत. तर आता सर्व शिक्षण ऑनलाइन तसेच कामेसुद्धा ऑनलाइन झाले असल्याने सहा इंचपेक्षा मोठा डिस्प्ले असणारे मोबाइल खरेदीसाठी ग्राहकांकडून पसंती दिली जात आहे. मात्र, हेच मोबाइल आता डोकेदुखी बनली आहे. कारण हे मोबाइल खिशात ठेवतासुद्धा येत नाही तसेच हातात ठेवणेसुद्धा अडचणींचे आहे. यामुळे बहुतेक जण मागच्या खिशात मोबाइल ठेवताना दिसून येतात. हे मोबाइल चोरणे चोरट्यांना सहज शक्य होत आहे. त्यामुळे मोठ्या डिस्प्लेचे मोबाइल वापरणे व सांभाळणे कठीण होत आहे.

बॉक्स

चोरी नव्हे गहाळ म्हणा

मोबाइल चोरीला गेला व तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेले तर तो मोबाइल हॅडसेट चोरीला नव्हे गहाळ झाला, असा उल्लेख केला जातो.

मोबाइल कागदपत्र नसले तर मोबाइलची तक्रार घेतली जात नाही. तसेच मोबाइल चोरीला गेला तर लगेच तक्रार घेतली जात नाही. दोन-तीन दिवसांत मोबाइल मिळाला नाही तर तक्रार घेतली जाते.

तुम्ही कुठे मोबाइल विसरला असेल पहिले शोधा, मग तक्रार करा, असे सल्ला पोलिसांकडून दिला जात आहे.

बॉक्स

या भागामध्ये मोबाइल सांभाळा

शहरातील गर्दीच्या ठिकाणावरून मोबाइल चोरली केली जात असल्याचे तक्रारीवरून समोर येत आहे. चंद्रपूर बसस्थानक, रेल्वेस्थानक, गंजवॉर्ड, गोलबाजार आदी परिसरातून अधिक मोबाइल चोरीला गेले आहेत. तर बाबुपेठपासून बल्लारपूर रोडकडे जाणाऱ्या मार्गावर एकटे आढळल्यास मोबाइल हिसकावून घेतले असल्याच्याही घटना समोर आल्या आहेत.

Web Title: Mobile thieves are comfortable as they do not fit in their hands or in their pockets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.