वर्षानुवर्षे बेरोजगारांची थट्टा सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:25 AM2020-12-23T04:25:42+5:302020-12-23T04:25:42+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना, राजुरा तालुक्यात प्रचंड प्रमाणात खनिज संपत्ती असून या ...
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना, राजुरा तालुक्यात प्रचंड प्रमाणात खनिज संपत्ती असून या संपत्तीचा फायदा घेत माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक, मुर्ली अॅग्रो आदी सिमेंट कंपन्यांनी तालुक्यात कारखाने उभे केले. या सिमेंट कंपन्यांच्या स्थापनेमुळे तालुके भरभराटीस येतील आणि स्थानिक बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशी आशा होती. मात्र, या उद्योगांमध्ये स्थानिक युवकांना पाहिजे तसा रोजगारच मिळाला नसल्याने बेरोजगारांमध्ये नैराश पसरले आहे. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे बाहेरगावी गेलेले अनेक तरुणही गावात आल्यामुळे त्यांची या कारखाण्यांकडून अपेक्षा वाढली आहे. त्यामुळे या बेरोजगारांना काम द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
कोरपना आणि राजुरा तालुक्यात असलेल्या खनिज साधनसंपत्तीचा फायदा घेत या दोन्ही तालुक्यात सिमेंट कंपन्या उभारण्यात आल्या. उद्योगासाठी लागणारी शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. तालुक्यात सिमेंट उद्योग येणार असल्यामुळे आपल्या हाताला काम मिळेल, अशी आशा येथील तरुणांना होती. त्यामुळे शेतकºयांनी आपल्या सुपिक जमिनी दिल्या. मात्र आजघडीला अनेक स्थानिक बेरोजगारांना कंपनीत सामावून घेण्यात आले नाही. दरम्यान, काही राजकीय तसेच सामाजिक संस्थांनी आंदोलनही उभारले. येथील शेतकºयांजवळ कसण्यासाठी शेतीही नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारी वाढतच आहे.
परिसरातील विविध गावांमध्ये अनेक युवक- युवती अभियंता, पदवी, आयटीआय यासारखे कौशल्यआधारीत शिक्षण घेवून नोकरीची वाट बघत आहे. आता तर कोरोनामुळे सर्वांना गावात आणले आहे. त्यामुळे स्थानिक उद्योगातून त्यांची अपेक्षा वाढली आहे.
-----