थॅलेसेमिया रुग्णांना मिळणार आधुनिक सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:38 PM2017-10-22T23:38:58+5:302017-10-22T23:39:08+5:30
जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळावी, यासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे, ....
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: जिल्ह्यातील थॅलेसेमिया रुग्णांना आधुनिक आरोग्य सुविधा मिळावी, यासासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे, असे मत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केले. वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय आणि थॅलेसेमिया बहुउद्देशिय कल्याणकरी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या थॅलेसेमिया दिनानिमित्त कार्यक्रमात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.
थॅलेसेमियाग्रस्त रुग्णासाठी चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक अकराचया बाजूला सुसज्य असे थॅलेसेमिया डे केअर सेंटर येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. थिंक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विनय शेट्टी, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. मुनघाटे, अध्यक्ष सुरेश आत्राम, महेश एस. पानसे, उपाध्यक्ष भास्कर शेंडे यांच्यासोबत थॅलेसेमिया डे केअर सेंटरच्या सभागृहाची पाहणी करण्यात आली. सुसज्ज करण्याकरिता थिंक फाऊंडेशन मुंबई व महेंद्रा अॅण्ड महेंद्राच्या कंपनीने आर्थिक सहाय्य केले. थॅलेसेमिया बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेच्या देखरेखीखाली हे काम पूर्ण झाले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांचे अध्यक्षीय भाषण झाले. डॉ. मोरे यांनी थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी वैद्यकीय सेवा चांगल्या कशा देता येईल, याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. डॉ. मुनघाटे यांनी विनय शेट्टी, थिंक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष व डॉ. विक्री रुग्वानी, डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. गांधी, डॉ. सूर्यवंशी आदींनीही विचार मांडले. यावेळी थॅलेसेमिया बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश आत्राम, सचिव महेश पानसे, उपाध्यक्ष भास्कर शेंडे, कोषाध्यक्ष छाया आत्राम तसेच पदाधिकारी राजेंद्र रणदिवे कायदे सल्लागार अॅड. श्रीकांत खोंड, सार्वे निकुरे, भक्ते, सुधीर पोटे आदी उपस्थित होते.