शेतकऱ्यांनी घेतली आधुनिक माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:51 PM2018-02-10T23:51:45+5:302018-02-10T23:52:23+5:30
उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत वरोरा तालुका कृषी विभागाच्या वतीने २७ शेतकरी महाराष्ट्रातील विविध गावात भेटी देवून पीक परिस्थितीची पाहणी करीत आहेत.
आॅनलाईन लोकमत
वरोरा : उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत वरोरा तालुका कृषी विभागाच्या वतीने २७ शेतकरी महाराष्ट्रातील विविध गावात भेटी देवून पीक परिस्थितीची पाहणी करीत आहेत.
वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील कळवन तालुक्यामधील बर्डे या गावात भेट देऊन कांदा, मक्का लागवड, शेडनेट, पॉली हाऊस, सुक्ष्म सिंचन व्यवस्थापन याची शेतावर जावून पहाणी केली. आपल्या शंकाचे निरसन उपस्थित कृषी अधिकाऱ्यांकडून करून घेत मक्का कांदा लागवडीकरिता वरोरा तालुक्यातील जमीन व हवामान याबाबतही शेतकºयांनी तज्ज्ञांसोबत चर्चा करून मार्गदर्शन घेतले. आपल्या भागात कापूस, सोयाबीन ही पारंपारिक ुपिके मोठ्या प्रमाणात शेतकरी घेत असतात. कधी निसर्गाने तर कधी दर पडल्याने शेतकरी नेहमी हवालदिल होत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मक्का, कांदा लागवड, शेडनेड, पॉलीहाऊस याचा उपयोग करून पिके घ्यावी, हा उद्देश ठेवून अभ्यासदौºयाचे आयोजन करण्यात आले होते. अभ्यास दौºयात वरोरा तालुक्यातील शेतकºयांना नाशिक येथील जिल्हा कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी मार्गदर्शन केले. अभ्यास दौºयाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. हसनाबादे, उपविभागीय कृषी अधिकारी राजवाडे, तालुका कृषी अधिकाही व्ही.आर. प्रकाश आदींचे सहकार्य लाभले.