आदिवासी भागातील शाळा अत्याधुनिक करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:48+5:302021-07-17T04:22:48+5:30
याप्रसंगी अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक संजय वैद्य, नितीन भटारकर, जगदीश ...
याप्रसंगी अर्जुनी मोरगावचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक संजय वैद्य, नितीन भटारकर, जगदीश जुनघरी, राजुरा विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे, सय्यद आबिद अली, बेबीताई उईके, तालुकाध्यक्ष शरद जोगी, नगरसेवक सुहेल अली उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनीही मार्गदर्शन केले.
तनपुरे म्हणाले, राज्यातील नागरिकांना स्वस्त वीज मिळावी, यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. यादृष्टीने सौरऊर्जेवर आधारित ऊर्जा निर्मितीला वाव दिला जात आहे. तसेच विविध कल्याणकारी योजना शासनातर्फे राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी आवाहन केले.
याप्रसंगी तालुक्यातील विविध पक्षांतील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बाॅक्स
कोसंबी आदिवासी बांधवांचा प्रश्न निकाली काढणार
कोसुंबी येथील आदिवासी बांधवांच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यावर न्याय देण्यासाठी प्रयत्न करू, असेही ना. तनपुरे यांनी सांगितले.
कोरपना येथे विज्ञान व वाणिज्य विद्याशाखा सुरू करणार
कोरपना येथे विज्ञान व वाणिज्य विद्याशाखेचे पदवी-पदव्युत्तर महाविद्यालय नाही. यादृष्टीने येथे या विद्याशाखा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत राज्याचे तंत्रशिक्षण राज्यमंत्री तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.