धनदांडग्या उद्योगपूतींसाठी काम करणारे मोदी सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:35 AM2021-06-09T04:35:45+5:302021-06-09T04:35:45+5:30

चंद्रपूर : केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित यूपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० ...

Modi government working for wealthy industrialists | धनदांडग्या उद्योगपूतींसाठी काम करणारे मोदी सरकार

धनदांडग्या उद्योगपूतींसाठी काम करणारे मोदी सरकार

Next

चंद्रपूर : केंद्रात डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रणित यूपीएचे सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलरपेक्षा जास्त प्रती बॅरल असतानाही देशांतर्गत किमतीवर त्याचा परिमाण होऊ दिला नाही. सामान्य लोकांना दिलासा देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती जवळपास ६४ डॉलर प्रति बॅरल एवढ्या कमी आहे. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर भरमसाट वाढले आहेत. मोदी सरकार हे सामान्य जनतेचे सरकार नसून ते फक्त मूठभर धनदांडग्या उद्योगपतींसाठी काम करणारे सरकार असल्याची टीका खासदार बाळू धानोरकर यांनी केली.

वरोरा येथे मोदी सरकारचा विरोधात दरवाढविरोधी आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बोलत होते.

यावेळी वरोरा शहर विलास टिपले, वरोरा शहर तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, उपाध्यक्ष वरोरा शहर मनोहर स्वामी, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा राजू चिकटे, उपाध्यक्ष न.प. वरोरा अनिल झोटिंग, सभापती वरोरा रवींद्र धोपटे, नगरसेवक राजू महाजन, अनिल वरखडे, गजानन मेश्राम, प्रशांत काळे, कृउबास उपसभापती देवानंद मोरे, सुभाष दांडदे, नीलेश भालेराव, उपसभापती संजीवनी भोयर, शिरोमणी स्वामी, यशोदा खामनकार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बाॅक्स

बजेट कोलमडले

केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाट वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लीटरचा टप्पा पार केला असून डिझेलही ९२ रुपये लीटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लीटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यातच महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. गृहिणींचे बजेट यामुळे कोलमडले असल्याने मोदी सरकारला जनता माफ करणार नाही, अशी टीका आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

Web Title: Modi government working for wealthy industrialists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.