एसटी महामंडळातील सेवानिवृत कर्मचाऱ्यांच्या विधनांनी मोफस पास द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:25 AM2020-12-23T04:25:20+5:302020-12-23T04:25:20+5:30
चंद्रपूर :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पती-पत्नी हयात असेपर्यंत वर्षातून सहा महिन्यांचा मोफत पास दिल्या जातो. परंतु ...
चंद्रपूर :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पती-पत्नी हयात असेपर्यंत वर्षातून सहा महिन्यांचा मोफत पास दिल्या जातो. परंतु सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या विधवाला एक महिन्याचा पास दिल्या जातो. त्यातच ६५ वर्षानंतर हा पास बंद केल्या जातो. त्यामुळे यामध्ये वाढ करून किमान सहा महिन्याचा पास द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.यासंदर्भात राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना चंद्रपूर विभागाच्या वतीने आमदार प्रतिभा धानोरकर यांना निवेदन देण्यात आले.
महामंडळातील सेवानिवृत्त कर्मचारी पती पत्नीस हयात असेलपर्यंत परीपत्रक १९०७ अंतर्गत १ डिसेंबर २०१८ प्रमाणे सहा महिन्याचा पास दिल्या जातो. त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास विधवांना ६५ वर्षांपर्यंतच एक महिन्याचा पास असतो. त्यामुळे हा अन्याय असून सहा महिन्याचा पास दयावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदन राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना विभाग चंद्रपूर-गडचिरोलीचे अध्यक्ष तसेच केंद्रीय कार्यकारिणी सदस्य हरिश्चंद्र जयपुरकर यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी सचिव पुंडलिक दुरुगकर, महिला प्रतिनधी कुसूम उदार, गडचिरोली प्रतिनधी मुरलीधर नेवलकर, शामराव आगलावे आदींची यावेळी उपस्थिती होती. परिवहन मंत्र्यांसोबत चर्चा करून हा विषय निकाली काढू, असे आश्वासन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी शिष्टमंडळाला दिले.