हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणजे मोहरम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:12+5:302021-08-20T04:32:12+5:30

राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभाव जाेपासतोय वराेरा येथील माेहरम गाैरव स्वामी वरोरा : हजरत महंमद पैगंबर यांची मुलगी फातिमा हिची ...

Moharram is a symbol of Hindu-Muslim unity | हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणजे मोहरम

हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणजे मोहरम

googlenewsNext

राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभाव जाेपासतोय वराेरा येथील माेहरम

गाैरव स्वामी

वरोरा : हजरत महंमद पैगंबर यांची मुलगी फातिमा हिची मुले हसन व हुसेन. यादिवशी त्यांची हत्या करण्यात आली. त्यांच्या स्मरणार्थ दु:ख व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे मोहरम.

वराेऱ्यामधे माेहरम हा सण मुस्लिम बांधवांसाेबतच हिंदू बांधव तसेच इतर सर्वधर्मिय सर्वधर्मसमभाव या भावनेने शांततापूर्वक साजरा करीत असल्याची परंपरा आहे. वरोरातील मोहरम हे हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. परिसरातील खेड्या-पाड्यातून तसेच इतर गावांतून नागरिक मोहरमसाठी वरोरा येथे येत असतात. मागील दाेन वर्षांपासून काेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणात असली, तरी दरवर्षी मोहरमनिमित्त वरोरात चांगलीच गर्दी उसळते. विशेष म्हणजे, आजपर्यंत एवढी गर्दी असतानाही कधीच शहरात अनूचित प्रकार घडलेला नाही. याच दिवसापासून मुस्लिम नवीन वर्षाची सुरुवात हाेत असते. चंद्रदर्शनापासून माेहरमची स्थापना करण्यात येतेे व ती दहा दिवसांपर्यत असते. या दहा दिवसांतील सातवी, आठवी, नववी हे विशेष दिवस असतात. यादिवशी गावातील प्रमुख श्रध्दास्थान असलेली दैवत जसे, कासपमंजा, अलीअब्बास, फुंदामाई, भुताची सवारी, बेताची सवारी, विविध ख्वाजे. ज्यांच्या अंगात देवता येते, ते धार्मिक स्थळासमाेर असलेल्या हाैदातील पेटत्या निखाऱ्यावर नाचतात, असे सांगितले जाते. त्यानंतर रात्रीपासून तर पहाटेपर्यंत मिरवणूकही निघत असते. तसेच शेवटचा दिवस दहावी या दिवशी सायंकाळपर्यंत सर्व सवारी उठतात व प्रमुख मुख्य मार्गाने मिरवणूक काढून मोहरमची समाप्ती होत असते. हे बघण्यासाठी बरीच गर्दी होत असते.

बॉक्स

अशी आहे आख्यायिका

असे म्हटले जाते की, फुंदामाई सवारी ज्या व्यक्तीच्या अंगात येत होती, ती व्यक्ती चंद्रपूरच्या कारागृहामध्ये बंदिस्त हाेती. मोहरमच्या दिवशी जेव्हा त्याच्या अंगात सवारी आली, त्यावेळेस कारागृहाचे बंद असलेले दरवाजे आपोआप उघडले व ती व्यक्ती भर पावसात चंद्रपूरमधून वरोरा येथे पायदळ आली.

Web Title: Moharram is a symbol of Hindu-Muslim unity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.