मोकाट जनावरांचा रस्त्यावर सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:30 AM2021-08-26T04:30:33+5:302021-08-26T04:30:33+5:30
गडचांदूर: औद्योगिक शहर गडचांदुरातील राज्य महामार्गावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असून अपघात होण्याची शक्यता आहे. शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर ...
गडचांदूर: औद्योगिक शहर गडचांदुरातील राज्य महामार्गावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट असून अपघात होण्याची शक्यता आहे. शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आहे. रस्त्यावर जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर असून याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
अगोदरच मुख्य रस्त्यावर बसस्थानक जवळ गतिरोधक नाही. परिसरात सिमेंट कारखाने असल्यामुळे जडवाहतूक मोठ्या प्रमाणात चालत असते. वाहनांचा शहरात प्रवेश होत असताना वेगमर्यादा असणे आवश्यक आहे. परंतु त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यातच रस्त्यावर असलेल्या मोकाट जनावरांची समस्या वाढत चाललेली आहे. दुचाकी चारचाकी वाहन चालकांना मोकाट जनावरांमुळे गाडी चालविताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गाडी चालवताना चालकाचे नियंत्रण सुटले किंवा ब्रेक लागले नाही तर जीवितहानी टाळता येऊ शकत नाही. म्हणून नगरपरिषदेने लक्ष देऊन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
250821\img_20210805_211230.jpg
रस्त्यावर बसलेली मोकाट जनावरे