राष्ट्रीय महामार्गावर मोकाट जनावरांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:29 AM2021-08-23T04:29:51+5:302021-08-23T04:29:51+5:30
सावली शहरातील बहुतांश रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या बघायला मिळतो. त्यामध्ये रमाबाई आंबेडकर विद्यालयाजवळ, डॉ. आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, ...
सावली शहरातील बहुतांश रस्त्यावर मोकाट जनावरांचा ठिय्या बघायला मिळतो. त्यामध्ये रमाबाई आंबेडकर विद्यालयाजवळ, डॉ. आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक, बसस्टँड चौकासह शहरातील अंतर्गत मार्गावरही मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे ठिय्या मांडून असतात. शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर अनेकदा वाहतूक प्रभावित होत असून, चालकांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जनावरमालक आपला त्रास वाचविण्यासाठी मालकीची जनावरे मोकाट सोडत आहेत. ती जनावरे रस्त्याच्या मधोमध बसतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेस चालकांना आपले वाहन चालविताना अडचण निर्माण होत आहे. अनेकदा रात्रीच्या वेळेस अपघातात जनावरांचे प्राणसुद्धा गेले आहेत. त्यामुळे अशा गंभीर बाबीकडे नगर प्रशासनाने लक्ष देऊन होणारे अपघात टाळावेत व मोकाट जनावरांच्या मालकावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी सावलीकरांकडून केली जात आहे.
220821\img-20210822-wa0156.jpg
महामार्गा वर जनावरांची गर्दी