चंद्रपूर शहरात मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:27 AM2021-08-29T04:27:30+5:302021-08-29T04:27:30+5:30

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम ४५३ अंतर्गत स्वच्छता विषयक तरतुदीमधील प्रकरण १४ मधील कलम २२ अंतर्गत उपरोक्त कारवाई करण्यात ...

Mokat pig catching campaign started in Chandrapur city | चंद्रपूर शहरात मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम सुरू

चंद्रपूर शहरात मोकाट डुक्कर पकडण्याची मोहीम सुरू

googlenewsNext

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम ४५३ अंतर्गत स्वच्छता विषयक तरतुदीमधील प्रकरण १४ मधील कलम २२ अंतर्गत उपरोक्त कारवाई करण्यात येत आहे. शहरात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात डुकरे मोकाट फिरत असून, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणत आहेत. मोकाट डुकरे शहरातील रस्त्यावर कुठेही मलमूत्र विसर्जन करून साथरोग प्रसार करण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे मनपाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. शहरांमध्ये अनेकांनी बेकायदेशीररीत्या वराहपालन व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी आपली डुकरे निर्जनस्थळी, वस्तिविरहित ठिकाणी बंदिस्त करून ठेवावेत. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या हद्दीत मोकाट डुकरे फिरताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे. मोकाट डुकरे फिरणार नाही, याची विशेष काळजी वराहपालन व्यावसायिकांनी स्वतः घ्यावी, अन्यथा त्यांचे आर्थिक नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार राहणार नाही, ही कारवाई तीन दिवसांच्या आत करून आपल्या डुकरांचा बंदोबस्त करावा, अशा सूचना मनपाचे अतिरिक्त आयुक्त पालीवाल यांनी दिल्या आहेत.

Web Title: Mokat pig catching campaign started in Chandrapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.