कचरा संकलनासाठी मोजावे लागणार पैसे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:54 PM2019-01-14T22:54:23+5:302019-01-14T22:54:37+5:30

लोकवर्गणीतून कचरा संकलनाचा खर्च वसूल करण्यात यावा, असा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने आता कचरा संकलनासाठी राज्यातील न. प. क्षेत्रातील नागरिकांना दर महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे.

Money to be collected for garbage collection! | कचरा संकलनासाठी मोजावे लागणार पैसे !

कचरा संकलनासाठी मोजावे लागणार पैसे !

googlenewsNext
ठळक मुद्देदंड आकारणीवर गुण : चार स्टार व सात स्टारसाठी भद्रावती न. प.चा प्रयत्न

सचिन सरपटवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : लोकवर्गणीतून कचरा संकलनाचा खर्च वसूल करण्यात यावा, असा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने आता कचरा संकलनासाठी राज्यातील न. प. क्षेत्रातील नागरिकांना दर महिन्याला पैसे मोजावे लागणार आहे.
घरे व आस्थापनामधून कचरा संकलन करण्यासाठी शुल्क आकारण्यात आले आहे. अ व ब वर्गातील नगरपालिकांमध्ये दरमहा घरगुती ४० रूपये, दुकाने ६० रूपये, शोरूम, गोदामे उपहारगृहे व हॉटेल ८० रूपये, राहण्याची व जेवणाची व्यवस्था असणारी हॉटेल १०० रूपये, पन्नास खाटांपेक्षा कमी रूग्णालये ८० रूपये, पन्नास खाटांपेक्षा जास्त रूग्णालये १२० रूपये तसेच शैक्षणिक धार्मिक संस्था व शासकीय निमशासकीय कार्यालयांसाठी ६० रूपये असे शुल्क आकारण्यात आले आहे. उपरोक्त दर हे दरवर्षी पाच टक्क्याने वाढविण्यात येणार आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी केंद्रामार्फत तपासणी सुरू असून भद्रावती शहरात ३१ जानेवारीपर्यंत केव्हाही तपासणी होण्याची शक्यता आहे. स्वच्छ सर्वेक्षण, कचरामुक्त शहर व हागणदारी मुक्त शहराचा दर्जा यातीलही योजनांची तपासणी वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे.
केंद्र तपासणी चमुद्वारे नागरिकांना सात प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यासाठी न. प. भद्रावतीने आपले अनुभव व मत मांडण्याकरिता ९७६४००९९७७ या क्रमांकावर डायल करून हॅलो स्वच्छतेला प्रतिसाद द्यावा असे आवाहन भद्रावती न. प. द्वारे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे. तसेच स्वच्छतेची तक्रार नोंदविणे अगदी सुलभ झाले असून निशुल्क स्वच्छ अ‍ॅप डाऊनलोड करावा, असे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
चार स्टार तारांकित मानांकन दर्जा यासाठी भद्रावती न. प. चा प्रस्ताव शासनाकडे केला असून दोन स्टार यापूर्वीच प्रमाणित करण्यात आले आहे.
तीन स्टारसाठी केंद्रीय चमू भद्रावती येथे येणार आहे. कचरा संकलन लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम, प्लॉस्टिकबंदीबाबत जनजागृती, बंदीसाठी केलेली कारवाई व दंड, घराच्या बाहेर रस्त्यावर फेकलेला कचरा व त्यावरची दंड आकारणी याला मार्कस देण्यात येणार आहे.
या सोबतच घराघरातून १०० टक्के कचरा संकलन, ओला व सुका कचऱ्याचे घरातूनच १०० टक्के वर्गीकरण व १०० टक्के कचºयावर प्रक्रिया व शौचालये तसेच शहराचा स्वच्छता याबाबत नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असल्याची माहिती न. प.भद्रावतीद्वारे देण्यात आली आहे. प्रत्येक मालमत्ताधारकाच्या घरी स्टिकर लावण्यात येत असून त्यावर एक नंबर देण्यात येवून त्याचे छायांचित्र घेवून न. प. ला पाठवण्यिात येत आहे.

न. प. द्वारे एकलाख ३६ हजार दंड वसूल
मागील सहा महिन्यात भद्रावती न. प. द्वारे प्लास्टिक वापराबाबतचा एक लाख ३६ हजाराचा दंड वसूल करण्यात आला असून याबाबत मोठ्या प्रमाणात कारवाई चालु आहे. यासोबतच उघड्यावर शौच करण्यासाठी ११०० रूपये, डस्टबीन न वापरणे, स्वच्छतेचा दंड २२०० सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्यासाठी २०० रूपये दंड व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे याबाबत २०० रूपये इतका दंड आकरण्यात आला आहे.

भद्रावती न. प. ला चार स्टार व सात स्टार मिळाल्यास शहराचे नावलौकिक होईल. विविध लोक शहराला भेटी देतील. स्वच्छ व सुंदर भद्रावतीसाठी शासनाकडून मोठा निधीसुद्धा मिळेल. यासाठी स्वत:च्या घरासारखे शहरसुद्धा स्वच्छ ठेवावे. सोबतच शाळा, महाविद्यालये, दवाखाने, धार्मिक संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने यांनीसुद्धा परिसर स्वच्छ ठेवून सहकार्य करावे. चालू वर्षाची घर टॅक्स पावती दाखवून स्वच्छतेची माहिती देणारे २०१९ चे कॅलेंडर न. प. मधून नागरिकांनी घेवून जावे.
-अनिल धानोरकर,
नगराध्यक्ष न. नप. भद्रावती

Web Title: Money to be collected for garbage collection!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.