पैसा झाला खोटा; दहा रुपयांचे नाणे चालेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:30 AM2021-09-22T04:30:57+5:302021-09-22T04:30:57+5:30
बॉक्स कुठल्याच नाण्यावर बंदी नाही रिझर्व बॅंकेने दहा रुपयांचे नाणे २००९ मध्ये चलनात आणले होते. मात्र बरेचदा ही नाणे ...
बॉक्स
कुठल्याच नाण्यावर बंदी नाही
रिझर्व बॅंकेने दहा रुपयांचे नाणे २००९ मध्ये चलनात आणले होते. मात्र बरेचदा ही नाणे बंद झाल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे आरबीआयने दहा रुपयांचे नाणे चलनात वैध असल्याचे स्पष्ट केले. दहा रुपयांची १४ प्रकारची नाणी वैध असून सर्वांनीच त्याचा चलनात उपयोग करावा, असे आवाहन रिझर्व बॅंकेने केले आहे.
बॅाक्स
कोणती नाणी नाकारतात
सध्या चलनात असलेल्या विविध नाण्यांपैकी एक, दोन, पाच रुपयांची नाणी सर्वजण बिनदिक्कत स्वीकारतात. मात्र दहा रुपयांची नाणी स्वीकारण्यास अनेक जण नकारघंटा दर्शवितात. एखाद्या वेळेस दहा रुपयांची जुनी नाणी स्वीकारतील, परंतु, पितळ व स्टेलनेस स्टील असे दुहेरी आवरण असलेली नाणी स्वीकारण्यास व्यावसायिक स्पष्ट नकार देतात.
बॉक्स
बँकांमध्ये नाण्यांचा मोठा साठा
बाजारपेठेत किंवा अनेक ठिकाणी दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास अनेकदा नकार मिळतो. मात्र बँकेमध्ये हे नाणे स्वीकारले जाते. त्यामुळे बॅंकांमध्ये दहा रुपयांच्या नाण्यांचा मोठा साठा उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणात नाणी जमा करायची असल्यास ती कुठून आली, याचे कारण बॅंकेत सादर करावे लागते.
बॉक्स
पैसा असूनही अडचण
माझी मुलगी पिग्मी बॅगमध्ये पैसे गोळा करायची. त्यामध्ये केवळ दहा व पाच रुपयांचे नाणे टाकायची. काही महिन्यांनंतर ते पैसे काढले. परंतु, कोणतीही खरेदी करावयास गेल्यास नाणी स्वीकारतच नसल्याचे दिसून येते. त्यामुळे ही नाणी करायची काय, असा प्रश्न आहे.
-राकेश रायपुरे
------
भाजीपाला विक्रेते किंवा किरकोळ विक्रेते दहा रुपयांची नाणी स्वीकारत नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे कोणीही जर आपणाला दहा रुपयांचे नाणे देत असेल तर घेण्यास भीती वाटते. त्यामुळे शक्यतो दहा रुपयांची नाणी घेण्यास अनेक जण टाळाटाळ करतात.
- संघर्ष सिद्धमशेट्टीवार,