पाण्यासाठी नागरिक मोजतात पैसे
By admin | Published: June 16, 2014 11:26 PM2014-06-16T23:26:35+5:302014-06-16T23:26:35+5:30
हजार लोकवस्ती असलेले ्रंगोंडपिपरी तालुक्यातील हिवरा गावातील विहिरी कोरडया पडल्या. तीन वर्षांपासून गावातील नळ योजना बंद आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी आलेले लाखो रुपये अडकले आहे.
धाबा : हजार लोकवस्ती असलेले ्रंगोंडपिपरी तालुक्यातील हिवरा गावातील विहिरी कोरडया पडल्या. तीन वर्षांपासून गावातील नळ योजना बंद आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी आलेले लाखो रुपये अडकले आहे. पाण्यासाठी गावात हाहाकार सुरू आहे. गावात ज्यांच्याकडील खासगी विहिरीत पाणी आहे. त्यांच्याकडून नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. एक ड्रम पाण्यासाठी १० रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे. निसर्गाची देणं असलेल्या पाण्याचा व्यापार केला जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मात्र येथील नागरिकांचा नाईलाज आहे.
कामे बाजूला सारुन येथील नागरिकांना बैलबंडीने पाण्यासाठी विहिरीवर जावे लागत आहे. मताचा जोगवा मागण्यासाठी आलेल्या लोकप्रतिनिधींकडेही गावकऱ्यांनी आपली पायपीट वाचली. मात्र, गावकऱ्यांच्या डोळ्यातील वेदना त्यांना आजही कळल्या नाही. लोकप्रतिनिधीप्रमाणेच प्रशासनही आठवड्यातून एखादे दिवशी गावाला भेट देतात.
भीषण पाणीटंचाईचा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडला गेला असता तर, किमान प्रशासनाकडून तात्पुरती उपाययोजना झाली असती. मात्र कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याने गावातील नागरिक आपली तहान पैसे देवून भागवित आहे. पैसे देऊन पाणी विकत घेणे सर्वांनाच शक्य नसल्याने गावात संतापाचे वातावरण आहे.
प्रशासनाने गावातील पाणीपुरवठा योजना सुरु करून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आहे. मात्र त्यांच्या या मागणीकडे प्रशासन तथा लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले आहे. (वार्ताहर)