अवकाळी पावसाने एका रात्रीत केला घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 06:00 AM2020-01-10T06:00:00+5:302020-01-10T06:00:25+5:30

खरिपात झालेले नुकसानीचे दु:ख विसरून आता शेतकऱ्यांनी रबी पिकांची लागवड केली. मात्र येथेही निसर्ग आडवा येत आहे. गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे ढगाळ वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला.

The monsoon rains lasted overnight | अवकाळी पावसाने एका रात्रीत केला घात

अवकाळी पावसाने एका रात्रीत केला घात

Next
ठळक मुद्देजिल्हाभरात मोठे नुकसान : आठवडाभरापासून ढगाळ वातावरण कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम आहे. अशातच अवकाळी पाऊसही हजेरी लावत आहे. बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्हाभर मुसळधार पाऊस बरसला. बुधवारी रात्रीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. सातत्याने ढगाळ वातावरण आणि अधेमधे पाऊस बरसत असल्याने गहू, हरभरा, तूर आदी रबी पिकांना जोरदार फटका बसला आहे. खरीप हंगामातील धान आणि कापसाचेही नुकसान झाले आहे.
खरिपात झालेले नुकसानीचे दु:ख विसरून आता शेतकऱ्यांनी रबी पिकांची लागवड केली. मात्र येथेही निसर्ग आडवा येत आहे. गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी, मका, भाजीपाला पिके धोक्यात आली आहे. चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे ढगाळ वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने तुरळक हजेरी लावल्याने शेतातील पिके उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण झाला. ढगाळ वातावरणामुळे कापूस पिकांसह रब्बी हंगामातील हरभरा, गहू, तूर, ज्वारी पिकांना मोठा फटका बसत आहे. रबी पिके आठवडाभरापूर्वी चांगली भरात आली होती. मात्र अचानक वातावरणात बदल झाला आहे. आठवडाभरापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्हाभरातच जोरदार पाऊस बरसला. किमान अर्धा-एक तास हा पाऊस कायम राहिला. त्यानंतर मध्यरात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास आणखी पाऊस बरसला.
या पावसामुळे खरीपातील धान, कापूस आणि रबीतील सर्व पिकांना जोरदार फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या वातावरणातील बदलामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांचा फुलोरा गळत असल्याने उत्पादन वाढीला फटका बसण्याची शक्यता आहे. निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतीला दिवसेंदिवस उतरती कळा आली आहे. पिकांची स्थिती चांगली असताना अचानक वातावरणात बदल झाल्याने कापसासह रबी हंगामातील सर्वच पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे आधीच कर्जाच्या ओझ्याख्नाली असलेला शेतकरी धास्तावला आहे. अकाली पावसामुळे वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या आहेत. यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले आहेत. कृषी विभागाने सर्व्हेक्षण करावे, अशी मागणी आहे.

नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम
सातत्याने ढगाळ वातावरण आणि अकाली पावसामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होत आहे. लहान मुलांना सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होत असून रुग्णालयात बालगोपालांची उपचारासाठी गर्दी दिसत आहे. सूर्यानेही नागरिकांना दर्शन देणे कमी केले आहे. सकाळपासून सुरू झालेले ढगाळ वातावरण रात्रीपर्यंत कायम राहत आहे. केव्हा सूर्यादय होतो आणि केव्हा मावळतो, हेच कळेणासे झाले आहे.

भाजीपाला पिकाचेही नुकसान
भद्रावती, वरोरा, सिंदेवाही, नागभीड या तालुक्यात बऱ्यापैकी भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. अनेकांच्या वाड्या आहेत. मात्र बुधवारी रात्री जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. याशिवाय भद्रावती तालुक्यात गाराही पडल्या. त्यामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी
चंद्रपूर जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी कडाक्याची थंडी पडू लागली होती. पारा चक्क ५.१ अंशापर्यंत घसरला होता. त्यामुळे आता जानेवारी महिना संपेपर्यंत अशीच थंडी कायम राहील, असे वाटले होते. मात्र ढगाळ वातावरणाने थंडीचा जोर कमी करून टाकला आहे. सातत्याने ढगाळ वातावरण राहत असल्याने पारा वाढला आहे. बुधवारी तापमान १६.६ अंशापर्यंत आले.

Web Title: The monsoon rains lasted overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस