सोमनाथला पावसाळी पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:26 AM2019-07-15T00:26:44+5:302019-07-15T00:28:15+5:30
मूल तालुक्यातील सोमनाथ परिसरात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी वाढली आहे. पर्यटक निसर्गाचा आनंद घेत आहेत. येथील हेमाडपंथी शंकराच्या मंदिरालगत शंखनाद करणारा धबधबा, आंब्याच्या अमराईत खळखळून वाहत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मारोडा: मूल तालुक्यातील सोमनाथ परिसरात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी वाढली आहे. पर्यटक निसर्गाचा आनंद घेत आहेत.
येथील हेमाडपंथी शंकराच्या मंदिरालगत शंखनाद करणारा धबधबा, आंब्याच्या अमराईत खळखळून वाहत आहे. धावपळीच्या काळातही येथे अनेक पर्यटक येत असून निसर्गाचा आस्वाद घेत आहेत. मूल शहरापासून नऊ किलोमीटरवर अंतरावर सोमनाथ आहे. येथे निसर्गरम्य वातावरण, वाहता धबधबा प्रत्येक पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. हिरव्याकंच वनराईत निखळपणे वाहनाऱ्या या धबधब्यामुळे मनाचे स्वप्नपूर्ण होत असून धरणशेजारील नैसर्गिक दगडी ओट्यांवर बसून अनेक तरुण- तरुणी बेभान होऊन नाचतांना दिसतात.
येथे ज्येष्ठ नागरिकही परिवारासह वनभोजनाचा आनंद घेत आहेत. धबधब्यात पवित्र लाटांच्या सरीवर-सरी जेव्हा अंगावर कोसळतात तेव्हा प्रत्येकजण स्वत:चे भान हरवून जात आहे. हा आनंद घेण्याचा दुर्मिळ योग सध्या सोमनाथमध्ये अनुभवता येत आहेत. या पर्यटनस्थळी मूल परिसरातीच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटक सध्या मोठ्या संख्येने येथे दाखल होत असून परिसरातील व्यावसायिकही सुखावले आहे.